

परिंचे: दक्षिण पुरंदरमधील वीर, परिंचे, दुधाळवाडी, पांगारे परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला अून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (दि. 8) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास परिंचेजवळील वीर-सासवड रस्त्यावरील पोलदरावस्तीवर 2 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी ग््राामस्थांच्या मदतीने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून दोन चोरांना पकडले, तर तिसरा चोरटा पसार झाला.
सोहेल आयुब शेख (वय 23, सध्या रा. येवलेवाडी, पुणे), प्रशांत विजय गायकवाड (वय 24, सध्या रा. पांडे, ता, भोर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत, तर हमीद शेख (रा. येवलेवाडी, पुणे) हा पळून गेला. याप्रकरणी तृप्ती काकडे व मोरेश्वर दुधाळ यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिंचे येथील पोलदरावस्तीतील नर्मदा दुधाळ (वय 75) या अंगणात बसल्या होत्या. त्याच वेळी मोरेश्वर दुधाळ हे रस्त्याच्या कडेला मुलांना शाळेतून घरी घेण्यासाठी उभे होते. यावेळी तीन संशयित युवक तेथे थांबून गप्पांचा बहाणा करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दुधाळ यांनी त्यांच्या गाडीचा क्रमांक लक्षात ठेवला. ते मुलांना घेऊन घरी गेल्यानंतर लगेचच या तिघा युवकांनी नर्मदा यांच्या गळ्यातील सुमारे 75 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
याच चोरट्यांनी पुढे पांगारे परिसरातील तृप्ती काकडे (वय 32) यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्रही हिसकावून पळ काढला. तृप्ती यांनी तातडीने पोलीस पाटील तानाजी काकडे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ परिंचे आऊटपोस्टचे हवालदार संदीप पवार यांना कळविले.
पोलिसांनी त्वरित पांगारे, खेंगरेवाडी, हरगुडे येथील तरुणांसह फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करून सोहेल शेख व प्रशांत गायकवाड या दोघांना अटक केली, तर तिसरा चोरटा हमीद शेख हा पसार झाला. सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, हवालदार संदीप पवार, विशाल जाधव पुढील तपास करत आहेत. चोरांना पकडण्यासाठी साहसी पाठलाग केल्याबद्दल परिंचे पोलिस चौकीचे हवालदार सचिन पवार, विशाल जाधव व त्यांच्या टीमचे ग््राामस्थांनी कौतुक केले.