HYROX Fitness Competition Pudhari
पुणे

HYROX Fitness Competition India: पुण्याच्या साक्षी छाजेडची HYROX स्पर्धेत झेप

बंगलोरमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फिटनेस स्पर्धेत 29वा क्रमांक पटकावून ठसा उमटवला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या हायरॉक्स (HYROX) फिटनेस स्पर्धेत साक्षी मनोज छाजेड हिने उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 11 आणि 12 एप्रिल रोजी बंगलोर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत जगभरातील आठ हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

साक्षी ही पुणेस्थित उद्योगपती, समाजसेवक मनोज छाजेड यांची कन्या आहे. साक्षी देखील आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असते. त्याचबरोबर तीने आपला हा छंद देखील जोपासला आहे.

या स्पर्धेत साक्षी मनोज छाजेड यांनी 29वा क्रमांक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली. HYROX ही एक जागतिक स्तरावरील हायब्रिड एंड्युरन्स रेस असून यात धावणे आणि फंक्शनल फिटनेस यांचा अनोखा संगम असतो. या स्पर्धेत एकूण 8 किलोमीटर धावण्याचा समावेश असून प्रत्येक 1 किलोमीटरनंतर एक वेगळा वर्कआउट स्टेशन असतो.

स्पर्धेतील टप्पे अत्यंत कठीण असून त्यामध्ये 1000 मीटर SkiErg, Sled Push (102 किलो), Sled Pull (78 किलो), 80 मीटर Burpee Broad Jumps, 1000 मीटर Rowing, 200 मीटर Farmer’s Carry, 100 मीटर Sandbag Lunges (10 किलो) आणि शेवटी 100 Wall Balls (4 किलो) यांचा समावेश होता.

ही स्पर्धा शारीरिक ताकद, सहनशक्ती आणि मानसिक धैर्य यांची कसोटी पाहणारी असून जगातील सर्वात आव्हानात्मक फिटनेस स्पर्धांपैकी एक मानली जाते. साक्षी मनोज छाजेड यांनी या कठीण स्पर्धेत केलेली उत्कृष्ट कामगिरी प्रेरणादायी असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT