Manchar Vegetable Market Price: गॅस टंचाईचा फटका; मंचर बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले

खरेदी मंदावल्याने बाजारभाव कमी; लिंबूला मात्र 1100 रुपयांचा उच्चांक
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

मंचर: गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे तरकारी खरेदी रोडावली आहे. त्यामुळे बाजारभावात घसरण झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे रविवारी (दि.12) तरकारी शेतमालाची एकूण 7,991 डाग इतकी आवक झाली. तरकारी व फळ भाज्यांच्या बाजारभावात घसरण झाली असली, तरी लिंबूला दहा किलोंना 1100 रुपये उच्चांकी बाजारभाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लगतच्या पाच तालुक्यांतून विविध प्रकारची विक्रीसाठी येत असते.

Vegetable
Pune ECO Friendly Cremation PMC Initiative: पुण्यात पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारांना चालना

शेतमालाला दहा किलोंना मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे:

कंसात डागाची आवक आणि मिळालेला बाजारभाव रुपयांत- लिंबू - (9) 400-1100, वाटाणा (41) 100-900, हिरवी मिरची (264) 70-581, लसूण (2) 200-500, टोमॅटो (131) 70-270, फ्लॉवर (2935) 10-100, बीट (1069) 20-201, घेवडा (73) 200-600, चवळी (42) 120-370, ढोबळी मिरची (224) 80-350, भेंडी (141) 80-401, फरशी (63) 50-500, तोंडली (61) 80-430, काकडी (1115) 10-150, वांगी (213) 15-150,

Vegetable
Pune Drunk Driving Accident: मद्यधुंद चालकाची धडक; बसचालकाचा मृत्यू

दुधी भोपळा (175) 20-130, आले (56) 150-400, मका (52) 70-120, वालवड (12) 420-470, राजमा (9) 550, पापडी (2) 460, गाजर (51) 80-150, बटाटा (116) 20-150, कोबी (443) 20-50, घोसाळी (29) 170, शेवगा (26) 100-430, दोडका-(79) 20-220, चिकू (19) 180-270, आवळा-(1) 300, कारले (99) 100-400, कैरी (98) 150-400, खरबूज (6) 100, रताळे (2) 50, गवार (263) 50-600, फापडा (3) 300, फणस (3) 200, डबल बी (2) 400, डांगर भोपळा (9) 60.

तरकारीच्या आवकेत घट झाली, तसेच तरकारी खरेदी करण्यासाठी गिऱ्हाईक नसल्यामुळे बाजारभावात घसरण झाली, असे बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news