पुणे: पुण्यातील एका ५५ वर्षीय प्राचार्यांना धमकावून गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून एका पोलीस उपनिरीक्षकासह तिघांनी सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दामिनी पथकात काम करणाऱ्या रील स्टार सोनाली हिंगे यांचा देखील समावेश आहे.
अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे, पोलिस उपनिरीक्षक बडे हा सद्या सायबर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. तर हिंगे ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दामिनी मार्शल म्हणून कार्यरत आहे. सोशल मीडियावर देखील रिलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. तर सुदाम तायडे हा देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेमकी साहेब. दरम्यान पोलिसांच्या या खंडणीखोरीच्या प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार प्राचार्य हे धनकवडीत राहतात. जुलै 2025 मध्ये हे तिघे पोलिस तक्रारदार काम करत असलेल्या कॉलेजमध्ये गेले. बडे याने विचारले तुम्ही एका मुलीचे कागदपत्रे काढून ठेवले आहेत का ? प्राचार्य म्हणाले प्रवेशाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे आम्ही आमच्याकडे ठेवतो. मी असे बोलल्यानंतर पीएसआय बडे यांनी त्यांचेकडे असलेला एक कागद दाखवला आणि मला बोलले की, या विद्यार्थीनीला तुम्ही मेट्रो स्टेशनवरती बंदुकीचा धाक दाखवुन तिला गाडीमध्ये ओढले असल्याची तुमच्या विरोधात तक्रार आलेली आहे. ती हिच तक्रार आहे असे बोलुन तो कागद माझेसमोर ठेवला, ती तक्रार मी वाचली त्यामध्ये बडे यांनी बोललेप्रमाणेच उल्लेख केलेला होता, परंतु त्यावर कुठल्याही प्रकारचे आवक व जावक क्रमांक नव्हता. ते वाचल्यानंतर बडे यांना प्राचार्यांनी हे सर्व खोटे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी मला तुमच्याकडे पिस्टल आहे का असे विचारुन ती मुलगी वयाने 18 वर्षाच्या आतील असल्याने पोक्सो कायद्यांन्वये तुमच्यावर कारवाई होवु शकते असे धमकावले
माझेविरोधात कोणतीही शहानिशा न करता पोक्सो कायद्यांन्वये कारवाई होईल, यामध्ये संस्थेचे नाव बदनाम होईल असे सांगुन आम्हांला भिती दाखविली व त्यानंतर असेही सांगितले की, तुमच्या संस्थेची कोठेही बदनामी होवु नये, म्हणुन मी हा अर्ज कोठेही रेकॉर्डवर न घेता आपल्याला भेटायला आलेलो आहे. ती मुलगी रडत असते आमच्या पथकातील सोनाली हिंगे हिने तिला समजावून सांगितले आहे.
बडे म्हणाला आम्ही ही केस रजिस्टर केली तर तुम्हाला अटक होईल व संस्थेची खुप बदनामी होईल, प्रेसमध्ये बातमी येईल व तुमचे कॅम्पसमध्ये प्रेसच्या गाड्यांना उभे रहायलाही जागा राहणार नाही. मुलीशी बोलुन काही मार्ग निघतो का ते पाहतो असे बोलुन पीएसआय बडे हे केबिन बाहेर पडले. थोड्यावेळाने बडे बाहेर जावुन दामिनी पथकातील हिंगे, आणि त्यांचा सहकारी यांचेबरोबर चर्चा करुन परत केबिनमध्ये आले. आत आल्यानंतर त्यांनी प्राचार्य आणि कॉलेजचे सीईओ यांना सांगितले. तुमच्या संस्थेचर्ची बदनामी टाळण्यासाठी 10 लाख रुपयांवरती तिला कसेतरी तयार केले आहे. त्यावर त्यांना मी कसलेही पैसे देण्यास नकार दिला. परत बडे याने प्राचार्यांना धमकावले.
कॉलेजमध्ये नविन प्रवेश प्रक्रीया चालु असल्यामुळे व कॉलेजचे नाव बदनाम होवू नये म्हणून प्राचार्यांनी बडे यांचे सांगणेप्रमाणे 7 लाख रुपये मुलीच्या शिक्षणासाठी देण्यास तयार झालो. त्यानंतर मी माझे घरात साठविलेले, माझ्या व माझे कुटुंबातील सदस्यांच्या वेगवेगळ्या बँकेतील खात्यातुन काही रक्कम काढुन 7 लाख रकमेची पुर्तता केली.
८ मार्च रोजी दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक
वर्षा देशमुख, यांनी प्राचार्यांना बोलावून संबंधित मुलीने पीएसआय बडे, सोनाली हिंगे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन, येथे त्यांचा विरुद्ध दिलेला तक्रारी अर्ज दाखविला. चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनी चौकशीत सांगितले भिती दाखवुन, फसवणूक करुन पीएसआय बडे,सोनाली हिंगे व त्यांचे सहकारी यांनी माझेविरुध्द खोटा अर्ज देण्यास भाग पाडले. तसेच त्यांच्यावर दबाव आणुन, पोक्सो कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्याची तसेच संस्थेची बदनामी होण्याची भीती दाखवुन ब्लॅकमेल केले. मुलीला हाताशी धरून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे माझे लक्षात आले. हा प्रकार पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर जातात त्यांनी याबाबत कठोर कारवाई केली.