Pune Drunk Driving Incident: पुण्यात मद्यधुंद चालकाचा थरार; वाहनांना धडक देत पोलिसाचे अपहरण करण्याचा प्रयत्न

पुण्यातील वारजे येथे मद्यधुंद कारचालकाने अनेक वाहनांना धडक देत वाहतूक पोलिसाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली
Drink And Drive
Drink And DrivePudhari
Published on
Updated on

पुणे: वारजे परिसरात मद्यधुंद कारचालकाने भरधाव गाडी चालवत चार ते पाच वाहनांना धडक दिली. दरम्यान, हा प्रकार निदर्शनास येताच त्याला रोखण्यासाठी गेलेल्या एका वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न केला.

Drink And Drive
NTA Revised Answer Key: NTA ची सुधारित उत्तरसूची जाहीर; दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर बदल

याप्रकरणी कारचालकाला वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संजोग सुरेश माने (वय 30) असे कारचालकाचे नाव आहे. संबंधित चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

Drink And Drive
Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन प्रकरणात सुनावणी पुन्हा पुढे

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर येथे जात होते. यावेळी खासगी प्रवासी वाहतूक करणारी एक कार शिवणेवरून वारजे माळवाडीकडे भरधाव निघाली होती. या कारने मार्गात काही वाहनांना धडक दिली आणि पुढे निघून गेली असल्याचे त्यांना समजले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षीरसागर यांनी तत्काळ संबंधित कारचा पाठलाग सुरू केला.

Drink And Drive
Maharashtra Overseas Scholarship Delay: शिष्यवृत्ती विलंबामुळे 75 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

वारजे चौका जवळ मद्यधुंद कारचालकाने एका टेम्पोला धडक देत नुकसान केले. यावेळी क्षीरसागर यांनी धाडसाने या कारला ओव्हरटेक करत थांबविले. तेथे जवळ असणाऱ्या वारजे माळवाडी वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी यांना आवाज देऊन मद्यधुंद कारचालकाला पोलीस चौकीत घेऊन जाण्याची सूचना दिली.

Drink And Drive
Pune Kerosene Shortage: पुण्यात रॉकेलचा तुटपुंजा कोटा; 8 लाख शिधापत्रिकाधारक अडचणीत

मात्र, वाहतूक पोलिस कर्मचारी कारमध्ये बसल्यानंतर चालकाने अचानक कार वेगाने पुढे चालवत पोलिस चौकीकडे न जाता बेधडकपणे वाहन चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही क्षणांसाठी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. यानंतर पुन्हा क्षीरसागर यांनी पाठलाग करून संबंधित चालकाला रस्त्यात अडविले आणि रस्त्यात चांगलाच चोप दिला. याबाबत पोलिस कर्मचारी अमोल पिसाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माने याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news