Pune Cancer Hospital Proposal: पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय रखडले; निधी व जागेचा पेच कायम

औंध परिसरात रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव प्रलंबित; कॅन्सर रुग्णांना अद्याप महागड्या उपचारांचा भार
Hospital
HospitalPudhari
Published on
Updated on

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभे राहावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, अशा दोन्ही स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एकीकडे निधीची कमतरता, तर दुसरीकडे जागेचा अभाव, अशा दुहेरी कात्रीत कर्करोग रुग्णालयाचा प्रस्ताव अडकला आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णांची महागड्या उपचारांपासून कधी सुटका होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Hospital
Pune Bike Theft Arrest: पुण्यात दुचाकी चोर जेरबंद; चार गाड्या जप्त

सार्वजनिक आरोग्य विभागाचे नियोजन

औंध जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सार्वजनिक आरोग्य विभागाची 60 ते 70 एकर जागा आहे. या ठिकाणी रुग्णालय उभारणीचे नियोजन आहे. आरोग्य विभागाने राज्यातील दहा रुग्णालयांसाठी प्रस्ताव तयार केला आहे. पुणे, नाशिक येथे कर्करोग आणि अन्य आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालय उभारणीचे नियोजन आहे. या रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाने आशियाई विकास बँकेला (एडीबी) प्रस्ताव सादर केला आहे. राज्यातील दहा रुग्णालयांसाठी सुमारे आठ हजार कोटींचा प्रस्ताव ‌‘एडीबी‌’ला सादर केला आहे.

Hospital
Pune Overhead Cable Crackdown: पुण्यात ओव्हरहेड केबलवर कडक कारवाई; छोट्या इंटरनेट ऑपरेटरवरही गुन्हे

...तर कॅन्सरग्रस्त रुग्णांना कमी दरात उपचार मिळणे शक्य!

वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे पुण्यात कर्करोग रुग्णालय व्हावे म्हणून 2013 पासून प्रयत्न सुरू आहेत. ससून रुग्णालय प्रशासनाने याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. ससूून रुग्णालयात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कर्करोगाचे रुग्ण उपचारांसाठी येतात.

Hospital
Pune Drunk Driving Incident: पुण्यात मद्यधुंद चालकाचा थरार; वाहनांना धडक देत पोलिसाचे अपहरण करण्याचा प्रयत्न

सद्यःस्थितीत येथे सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. सध्या केमोथेरपीची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, रेडिएशन थेरपी आणि पॅलिएटिव्ह केअरची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील रुग्णावर उपचार करताना अडचणी येतात. कर्करोगाचे स्वतंत्र रुग्णालय उभे राहिल्यास कमी दरात उपचार मिळणे शक्य होणार आहे.

Hospital
NTA Revised Answer Key: NTA ची सुधारित उत्तरसूची जाहीर; दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर बदल

राज्य सरकार रुग्णालय उभारणीचा निर्णय घेणार आहे. याबाबत दोन विभागांमध्ये कोणताही वाद नाही. आरोग्य विभागाला आशियाई विकास बँकेतर्फे निधी मिळाल्यानंतर राज्यात नवीन चार रुग्णालये उभारण्याचे नियोजन आहे. यामध्ये पुण्याचा विचार करण्यात येईल. दोन्ही विभागांमध्ये समन्वय असून, रुग्णांसाठी कर्करोगावरील उपचार उपलब्ध व्हावेत, हाच प्रयत्न आहे.

प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news