पीएमपीत पॅनिक बटण यंत्रणाच ‌‘पॅनिक‌’ Pudhari
पुणे

Pune PMPML panic button issue: पीएमपीत पॅनिक बटण यंत्रणाच ‌‘पॅनिक‌’

बहुतांश वाहनांमध्ये यंत्रणा कार्यान्वितच नाही; परिवहन आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महिला प्रवाशांसह अन्य प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, याकरिता राज्य शासनाने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये पॅनिक बटण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याकरिता अंधेरी येथे कोटी रूपये खर्चून कंट्रोल रूमसुद्धा तयार करण्यात आली आहे. मात्र, पुण्यात बहुतांश वाहनांमध्ये ही पॅनिक बटण यंत्रणाच कार्यान्वित नसल्याचे पाहणीदरम्यान समोर आले आहे. यामुळे पुण्यातील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे.(Latest Pune News)

निर्भया प्रकरणानंतर खबरदारीचा उपाय आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असलेले ‌‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस‌’ (व्हीएलटीडी) आणि पॅनिक बटण ही प्रणाली सध्या बहुतांश वाहनांमध्ये निष्क्रिय असल्याचे समोर आले. त्यामुळे ही यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आदेश दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, या आदेशाला वाहनचालकांनी

आदेशात आणखी काय होते?

परिवहन विभागाच्या ‌‘वाहन शक्ती‌’ या संगणकीय प्रणालीवर व्हीएलटीडी बंद असलेल्या वाहनांची यादी तयार केली जात आहे. या यादीनुसार संबंधित वाहनमालकांना नोटीस पाठवून, त्यांना सात दिवसांच्या आत ही प्रणाली पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर सात दिवसांच्या आत ही प्रणाली सक्रिय केली नाही, तर संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांनी त्यांच्या वाहनात बसविलेले व्हीएलटीडी उपकरण परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाने प्रमाणित केलेले आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच, हे उपकरण पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी व्हीएलटीडी विक्रेता किंवा सेवा पुरवठादाराशी संपर्क साधावा, असेही आदेशात म्हटले आहे.

महिला प्रवाशांच्या दृष्टीने पीएमपीएमएलसह सर्व खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये ही प्रणाली लवकरात लवकर बसविणे आवश्यक आहे. मी याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे. पाठपुराव्यामुळे नुकताच परिवहन आयुक्तांनी ही यंत्रणा वाहनांमध्ये कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. मात्र, परिवहन आयुक्तांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. इतर खासगी वाहनांसोबतच पीएमपीएमएलच्या बसमध्येही ही पॅनिक बटण यंत्रणा कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे राज्यशासनाची पॅनिक बटण यंत्रणाच ‌‘पॅनिक‌’ मध्ये आहे, असे वाटते.
संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच
पॅनिक बटण यंत्रणेसाठी राज्यस्तरीय कमांड कंट्रोल रूम कार्यरत करण्यात आली आहे. नवीन गाड्यांमध्ये ही यंत्रणा आहेच, जुन्या गाड्यांनाही, ही यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले आहेत. जर पुण्यात ही यंत्रणा बसवली नसेल तर याची माहिती घेतो.
विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT