voting and counting accuracy  File Photo
पुणे

Pune Municipal Election: महापालिकेकडून मतमोजणीची तयारी पूर्ण! पुण्यात 15 ठिकाणी मतमोजणी केंद्रे जाहीर

मतदानानंतर ईव्हीएम ‘स्ट्राँग रूम’मध्ये सुरक्षित; क्रीडांगणे, शाळा-महाविद्यालये, सांस्कृतिक केंद्रांमध्ये मतमोजणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी अवघे सात दिवस शिल्लक असतानाच महापालिकेने मतमोजणी केंद्रांची अधिकृत घोषणा केली आहे. संबंधित प्रभागातील क्रीडासंकुले, शाळा-महाविद्यालये, सांस्कृतिक केंद्रे अशा विविध ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे. तसेच, मतदानानंतर मतदानयंत्रे (ईव्हीएम) संबंधित मतमोजणी केंद्रांवर उभारण्यात येणाऱ्या ‌‘स्ट्राँग रूम‌’मध्ये सुरक्षित ठेवली जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त अरविंद माळी यांनी दिली.

नगर रस्ता-वडगाव शेरी तसेच धनकवडी-सहकारनगर या क्षेत्रीय कार्यालयांतील प्रभागांची मतमोजणी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या आवारातच होणार आहे. इतर क्षेत्रीय कार्यालयांतील मतमोजणीसाठी स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था केली आहे. बहुतांश ठिकाणी मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे, त्याच ठिकाणी मतदानयंत्रांचे वितरणही केले जाणार आहे.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी सारसबाग येथील बाबूराव सणस मैदानावरील कबड्डी मैदानावर होईल. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची मतमोजणी वडगाव येथील शरदचंद्र पवार ॲकॅडमी ऑफ ई-लर्निंग येथे पार पडणार आहे. कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होईल.

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या पत्राशेडमध्ये होणार आहे. घोले रस्ता-शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर केली जाणार आहे.

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज ई-लर्निंग स्कूलमध्ये होईल. वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी वानवडी येथील एसआरपीएफ क्रमांक 1 मधील जिजाऊ मंगल कार्यालयात पार पडणार आहे. हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातील कर्मवीर सभागृहात होईल.

येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी खराडी येथील राजाराम पठारे स्टेडियममध्ये होणार आहे. औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होईल. कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठात पार पडणार आहे.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी रामोशी गेट पोलिस चौकीजवळील रफी अहमद किडवई माध्यमिक महाविद्यालयात होईल. वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी पौड फाटा येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत होणार आहे. ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारकात पार पडणार आहे. नगर रस्ता-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातच केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT