Massive Ringed System Pudhari
पुणे

Massive Ringed System Galaxy: पुण्यातील संशोधकांनी शनि सारखी मोठी वर्तुळाकार प्रणाली शोधली

मंदाकिनी आकाशगंगेपासून 3,200 प्रकाशवर्षांवर दिसलेली ही दुर्मीळ प्रणाली, तारेपेक्षा भव्य व अद्भुत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आपल्या मंदाकिनी (मिल्कीवे) या आकाशगंगेपासून सुमारे 3 हजार 200 प्रकाशवर्षे दूर अंतरावर शनीपेक्षाही प्रचंड मोठ्या कडा असणारी एक वर्तुळाकार प्रणाली दिसली आहे. याला ग््राह किंवा तारा न म्हणता शास्त्रज्ञांनी वर्तुळाकार प्रणाली असे वर्णन केले आहे. दुर्बिणीतून पाहिलेल्या वर्णनानुसार शास्त्रज्ञांनी त्याच्या प्रतिमा तयार केल्या आहेत. त्यावरून तो शनीपेक्षाही मोठा दिसतो आहे.

आंतरविद्यापीठीय खगोल भौतिकी आणि संशोधन संस्था (आयुका) येथील संशोधक डॉ. सारंग शहा यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले असून, ते जगात प्रथमच शोधनिबंधाच्या माध्यमातून मांडले आहे. डॉ. सारंग हे पीएच.डी.च्या पुढचे संशोधन अन्‌‍ शिक्षण आयुका येथे घेत आहेत. त्यांनी हे संशोधन सतत दीड वर्षाच्या संशोधनातून केले. या वर्तुळाकार प्रणाली नेमक्या काय आहेत, याचे पुढचे संशोधनही ते करत आहेत.

शास्त्रज्ञांची निरीक्षणे...

  • हॉवर्ड विद्यापीठाची निरीक्षणे तपासली असता असे लक्षात आले की, 1937 आणि 1981 मध्ये ही शनी सारखी कडा असलेली ही प्रणाली आकाशगंगेत दिसली होती. त्यानंतर 2024 मध्ये ही तिसऱ्यांदा दिसली. या पुढे 43 वर्षांनी 2067 मध्ये पुन्हा दिसणार आहे.

  • जो चमकणारा तारा आहे त्याच्या आजुबाजूला पृथ्वी, मंगळासारखे गृह असून त्यांची एकमेकांशी टक्कर होवून आकाशगंगेत प्रचंड कचरा गोळा झालेला आहे.

  • ओहियोमध्ये असणाऱ्या ‌‘असार‌’ या महाकाय दुर्बिणीतून ही दृष्टे टिपल्याने त्या ताऱ्याला ‌‘असार एसएन 24 एफ 6‌’ असे सांकेतिक नाव दिले आहे.

  • ही दुर्बीण रोज रात्री आकाशातील सर्व ग््राह ताऱ्यांचे निरीक्षण करून फोटो, चित्रण आणि निरीक्षण नोंदवत असते. त्यामुळे हे संशोधन करता आले.

शास्त्रज्ञांना नेमके काय दिसले

  • अवकाशातील 12 राशीचक्रात मिथुन राशीजवळ हा ग््राहवजा तारा 16 सप्टेंबर 2024 रोजी दिसला.

  • अमेरिकेतील ओहियो येथील महाकाय दुर्बिणीने तसा अलर्ट दिला अन्‌‍ चित्रे पाठवली.

  • आपल्या ‌‘मंदाकिनी‌’ या आकाशगंगेपासून 3 हजार 200 प्रकाशवर्षे दूर अंतरावर एक तारा मंद होत आहे असे दिसले.

  • तारे चमकताना दिसतात. मात्र, मंद होतानाची प्रक्रिया दुर्मीळ असल्याने आयुकातील शास्त्रज्ञ डॉ. सारंग शहा यांनी त्याचा अभ्यास सुरू केला.

  • तो तारा तब्बल नऊ महिने मंद होता. मात्र, त्याच्यासमोर गुरूसारखा आकाराने मोठा, पण शनीसारखी महाकाय कडा असणारी वर्तुळाकार प्रणाली दिसली.

  • या तेजस्वी वस्तूला ग््राह किंवा तारा म्हणता येणार नाही, असे निरीक्षण शास्त्रज्ञांनी केले आहे. कारण ही प्रणाली एका प्रखर ताऱ्यासमोर आल्याने तब्बल आठ महिने त्या ताऱ्याचा प्रकाश मंद झालेला दिसत होता.

  • 16 सप्टेंबर 2024 ते 31 मे 2025 असा आठ महिने तो तारा मंद झालेला दिसला. मात्र, ही महाकाय प्रणाली बाजूला होताच तो तारा अचानक तेजस्वी दिसू लागला.

आपल्या ‌‘मंदाकिनी‌’ या आकाशगंगेपासून 3 हजार 200 प्रकाशवर्षे दूर असणारा एक तारा तब्बल आठ महिने मंद होता. तारा कधी मंद होत नाही. त्यामुळे त्याचे निरीक्षण सतत आठ महिने केल्यावर लक्षात आले की, तो अचानक त्याच्या समोर शनीपेक्षाही तेजस्वी अन्‌‍ भल्यामोठ्या कडा असणारी वर्तुळाकार प्रणाली दिसते आहे. मात्र, पुढे असे लक्षात आले की, तो ग््राह किंवा तारा नाही. ते नेमके काय आहे. यावर आमचे पुढचे संशोधन सुरू आहे.
डॉ. सारंग शहा, संशोधक, आयुका, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT