Maharashtra Professor Recruitment: प्राध्यापक भरतीसाठी सुधारित अध्यादेश जाहीर; 60-20-20 गुणपद्धतीवरून नव्या वादाची शक्यता

एनआयआरएफ रँकिंगवर आधारित गुणदान कायम; उमेदवारांकडून पुन्हा आक्षेप नोंदवले जाण्याची शक्यता
Professor
ProfessorPudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील नियमित प्राध्यापकांच्या भरतीसंदर्भातील सुधारित अध्यादेश अखेर प्रसिद्ध झाला असून, त्यात शैक्षणिक व संशोधन पात्रता, अध्यापन कौशल्य मूल्यमापन आणि मुलाखतीमधील कामगिरी यासाठी अनुक्रमे 60, 20, 20 असे गुण दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु यामधील काही नियमांवरून वादंग निर्माण होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Professor
HSC Exam Mass Copying: बारावीच्या पहिल्याच दिवशी मास कॉपी; छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 अधिकाऱ्यांवर गुन्हा

राज्य शासनाने प्राध्यापक भरतीसंदर्भातील पारदर्शकतेसाठी राज्यपाल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार अध्यादेश प्रसिद्ध केला होता. परंतु, त्यावर शिक्षण क्षेत्रातून टीका करण्यात आली होती. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा एकदा सुधारित अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. या अध्यादेशात शैक्षणिक पात्रता अध्यापन कौशल्य आणि मुलाखत यासाठी वेगवेगळे गुण दिले आहेत. त्यामुळे 60+20+20 असे गुण गृहीत धरून पुढील काळात प्राध्यापक भरती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे पीएचडी, एम.फिल.साठी 17 गुण आहेत. नेट जीआरएफ, फक्त नेट व सेट परीक्षेसाठी वेगवेगळे गुण आहेत.

Professor
Pune TDR Approval Process: टीडीआर प्रस्तावांना सात दिवसांत मंजुरी; पुणे महापालिकेची नवी कार्यपद्धती लागू

तसेच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा अनुभव ग््रााह्य धरला जाणार आहे, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीसंदर्भातील सुधारित अध्यादेश प्रसिद्ध केला असला तरी त्यावर आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी गुणदान असून, संबंधित विद्यार्थ्याला किती टक्के गुण मिळाले आहेत हा विचार करून संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन केले जाणार आहे. त्यामुळे निश्चितच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

Professor
Jilha Parishad Election Expense Limit: जिल्हा परिषदेसाठी 9 लाख, पंचायत समितीसाठी 6 लाख खर्च मर्यादा; दरसूची जाहीर

एनआयआरएफ रँकिंगमध्ये ज्या विद्यापीठाने चांगली कामगिरी केलेली आहे, अशा विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना वेगवेगळे गुणदान होणार असल्याचे अध्यादेशामधून स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे क्यूएस रँकिंगसह इतर परदेशी विद्यापीठांच्या क्रमवारीत संबंधित विद्यापीठ कोणत्या क्रमांकावर आहे, याचा विचार करूनसुद्धा संबंधित विद्यार्थ्याला गुण दिले जाणार आहेत.

Professor
Takli Haji Theft: टाकळी हाजीतील शिनगरवाडीत अल्पवयीनांकडून चोरी व तोडफोड; ग्रामस्थांमध्ये भीती

त्यामुळे ज्या गोष्टीवर उमेदवारांनी आक्षेप घेतला होता; ती बाब अजूनही कायम आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वी कोणत्या विद्यापीठांमधून पदवी घेतली आणि ते विद्यापीठ आता एनआयआरएफ रँकिंगमध्ये कोणत्या क्रमांकावर आहे, याचा विचार करून उमेदवाराला प्राध्यापक भरतीसाठी गुणदान दिले जाणार आहेत. हे तार्किक नसल्याने या मुद्द्‌‍यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news