Pune delivery boy accident: डिलिव्हरी बॉयचा अपघातात मृत्‍यू

वडगाव बुद्रुकमधील सिंहगड कॉलेज रोडवरील क्रिकेटच्‍या मैदानाजवळील प्रकार
Pune Delivery Boy Death
Pune Delivery Boy DeathPudhari
Published on
Updated on

पुणे : ऑनलाइन शॉपींग साईच्‍या माध्यमातून घरगुती सामान घरी पोहचविण्यासाठी जात असलेल्‍या डिलिव्‍हरी बॉयला मद्यधुंद चालकाकडील भरधाव वेगातील कारने दिलेल्‍या धडकेत त्‍याचा मृत्‍यू झाला. हा प्रकार वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज रोड येथील क्रिकेटच्‍या मैदानाजवळ घडला. धडक देणारी कार त्‍याला मदत न करताच निघून गेल्‍याने डिलिव्‍हरी बाॅयचा मृत्‍यू झाला.

Pune Delivery Boy Death
Zepto Delivery Boy: झेप्टो डिलिव्हरी बॉयला मारहाण? रायडर्सचा ग्रुप ग्राहकाच्या घरी; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

राहुल दिनकर पवार (वय 30, रा. मु. पो. पाटण, ता. सिंदखेडा, जि. धुळे) असे अपघाती मृत्‍यू झालेल्‍याचे नाव आहे. तर याप्रकरणी सोजल शामराव औटी (वय 22, रा. शेलपिंपळगाव, आळंदी), अभिषेक संजय शिंदे (वय 21, रा. कोळणे फाटा, आळंदी) आणि विघ्नहर्ता शामराव औटी (वय 27, रा. शेलपिंपळगाव, आळंदी, पुणे) यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करून त्‍यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Pune Delivery Boy Death
BITS Pilani Goa Student Deaths | बिट्स पिलानी कॅम्पस, 14 महिन्यांत 6 मृत्यू; 'युवा फॉरवर्ड'कडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

हा अपघात 10 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्‍या सुमारास घडला. याबाबत राहुलचा मित्र कैलास विक्रम डोईफोडे (वय 46, रा. धायरी रोड, गोकुळनगर) याने फिर्याद दिली आहे. याबाबत तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक माधुरी काजळे यांनी सांगितले, कारमधील तीन आरोपींना अटक केली आहे. मद्यधुंद अवस्‍थेत आरोपी कार चालवत असल्‍याचे निष्पन्न झाले आहे. तर राहुल हा मुळचा धुळे येथील रहिवासी असून मागील दोन वर्षांपासून कामासाठी तो पुण्यात आला होता. डिलिव्‍हरी बॉयचे काम करून तो स्वतःची उपजिविका भागवत घरी पैसे पाठवत होता. राहुलच्‍या गावाकडे याबाबत माहिती दिली असून त्‍याचे घरचे पुण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news