Pune Traffic News: पुण्यात पोलीस भरती, या परिसरातील वाहतूक बदल

पोलीस भरतीनिमित्त ग्रामीण पोलीस मुख्यालय परिसरात वाहतूक बदल
Pune Road Diversion
Pune Road DiversionPudhari
Published on
Updated on

पुणे : पोलीस भरती प्रक्रियेनिमित्त पाषाण रस्त्यावरील पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील अंतर्गत रस्ते दररोज पहाटे चार ते सायंकाळी सहा यावेळेत वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

Pune Road Diversion
Pune Budhwar Peth Police Raid: बुधवार पेठेत मध्यरात्री मोठी पोलिस कारवाई; 39 कुंटणखान्यांची झडती

ग्रामीण मुख्यालयाच्या परिसरातील वाहतूक बदल १७ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहेत. पोलीस भरती प्रकियेसाठी उमेदवारांची ग्रामीण मुख्यालायाच्या आवारात उमेदवारांची होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून (११ फेब्रुवारी) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. ग्रामीण मुख्यालयातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक बदल १७ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहेत. या भागातील वाहतूक दररोज पहाटे चार ते सायंकाळी सहापर्यंत बंद राहणार आहे.

Pune Road Diversion
Ahilyanagar Police Recruitment 2026: अहिल्यानगर पोलिस भरतीला प्रारंभ; पहिल्याच दिवशी 503 उमेदवार पात्र

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.पाषााण रस्त्यावरील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते बाणेर रस्त्यावरील पुरंदर हाॅल दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पाषाण रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळील प्रवेशद्वार ते बाणेर ररस्त्यावरील प्रवेशद्वार हा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news