Library Pudhari
पुणे

Pune Libraries Closing: आर्थिक अडचणींमुळे पुणे जिल्ह्यातील 53 ग्रंथालयांना टाळे

अनुदानाच्या अभावामुळे शहरातील 7 ग्रंथालयेही बंद; 40 टक्के अनुदानवाढीची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यभरातील अनेक ग््रांथालयांना आर्थिक अडचणीमुळे कायमस्वरूपी टाळे लागले आहे. त्यात पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग््रांथालयांचाही समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत पुणे जिल्ह्यातील 53, तर पुणे शहरातील 7 ग््रांथालये बंद पडली आहेत.

2021 मध्ये पुणे जिल्ह्यात 565 ग््रांथालये होती. पण, आता ही संख्या 512 वर आली आहे, तर शहरात 89 ग््रांथालये होती ती संख्या आता 82 वर आली आहे. ग््राामीण भागातील ग््रांथालयांची स्थिती आताही बिकट असून, सद्य:स्थितीला आणखी काही ग््रांथालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

महाराष्ट्रात आता एकूण 11 हजार 155 सार्वजनिक ग््रांथालये आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात फक्त 512 ग््रांथालये उरली असल्याची माहिती समोर आली आहे. शासकीय अनुदान मिळण्यात सातत्य नसल्याने ग््रांथालयांना व्यवस्थापनाचा खर्च भागविण्यासह कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण होत आहे. वाचनसंस्कृतीला पुढे नेणाऱ्या ग््रांथालयांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत आणि 40 टक्के अनुदानवाढीसाठीच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी ग््रांथालय प्रतिनिधींकडून होत आहे.

याविषयी सिद्धार्थ वाचनालयाचे ग््रांथपाल दिलीप भिकुले म्हणाले, ‌‘आर्थिक अडचणीमुळे वीजबिल, जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन, ग््रांथ खरेदी अशा विविध गोष्टी करणे ग््रांथालय प्रशासनाला अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे सरकारने ग््रांथालयांच्या अडचणी जाणून ग््रांथालयांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्वरित पाऊले उचलावीत.

पुण्यातील तालुकास्तरीय ग््रांथालयांची संख्या

पुणे शहर - 82, आंबेगाव - 45, इंदापूर - 76, खेड - 44, जुन्नर - 33, दौंड - 21, पुरंदर - 20, बारामती - 41, भोर - 12, मावळ - 14, मुळशी - 6, वेल्हे - 13, शिरुर - 45, हवेली - 60.

नवीन ग््रांथ खरेदीपासून ते ग््रांथालयाच्या जागेचे भाडे देणेही कठीण झाले आहे. कमी वेतनामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरीही सोडली आहे. ग््रांथालयांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. सरकारने 40 टक्के अनुदान वाढीचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे अनुदानवाढीची अंमलबजावणी त्वरित करावी.
राजेंद्र सुतार, मानद सचिव, सार्व. वाचनालय राजगुरूनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT