Dattatray Bharne Pudhari
पुणे

Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महायुतीचाच विजय होणार; दत्तात्रय भरणे यांचा विश्वास

सराटीतील प्रचार मेळाव्यात डॉ. स्मिताताई जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बावडा: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित असून, त्यांच्या मोठ्या मताधिक्याने विजयासाठी अधिकाधिक मतदान वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी (दि. २०) केले.

सराटी येथे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ मतदारांचा मेळावा झाला. यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी भाजपचे आ. अनुप अग्रवाल म्हणाले, अजितदादा पवार हे महायुतीचे प्रमुख नेते होते. महायुतीची ताकद दाखविणेसाठी डॉ. स्मिताताई जाधव व कौस्तुभ गावडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करून विधानपरिषदेवर पाठवा.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले, डॉ. स्मिताताई जाधव व कौस्तुभ गावडे या दोन्ही उमेदवारांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही उमेदवारांच्या मोठ्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत.

या मेळाव्यामध्ये इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, पुणे जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीमंत ढोले, दत्तात्रय घोगरे, पंडितराव पाटील, व्ही. सी. बोराटे यांनी भाषणामध्ये डॉ. स्मिताताई जाधव व कौस्तुभ गावडे या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कांतीलाल झगडे, संदीप पाटील, बाळासाहेब करगळ, शिवाजी मोहिते, महादेव घाडगे, श्रीकांत बोडके आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. पी. मगर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT