Fish  Pudhari File Photo
पुणे

Pune Fish Market Rates: श्रावणामुळे मासळीची मागणी घटली; गणेश पेठ बाजारात दर स्थिर

पुण्यात मासळीची १५ ते २० टन आवक; चिकन, मटण आणि अंड्यांचे भावही स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: श्रावणातील व्रत-वैकल्ये, उपवास आणि सणांमुळे मासळीची मागणी कमीच आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून मागणीचा अंदाज घेऊन माल मागविला जात आहे. गणेश पेठ मासळी बाजारात मासळीचे गत आठवड्यातील तेजीतील दर कायम आहेत. चिकन, मटण आणि अंड्यांचाही मागणीएवढाच पुरवठा होत असल्याने त्यांचे भाव स्थिर आहेत.

गणेश पेठ बाजारात रविवारी (दि. ६) पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून खोल समुद्रातील मासळीची १५ ते २० टन, खाडीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो, तर नदीच्या मासळीची ६०० ते ७०० किलो आवक झाली. आंध्र प्रदेशातून रहू, कतला आणि सिलन मासळीची मिळून सुमारे १५ ते २० टन आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : १५००-१८००, मोठे : १५००-१८००, मध्यम : १०००-१२००, लहान : ८००-१०००, भिला : ५००-६००, हलवा : ६००-८००, सुरमई ५००-९००, रावस : ७००-९००, घोळ : ७००-८००, करली : ३००-३५०, भिंग : ३५०, पाला : १०००-१४००, वाम : काळी : ३००-४००, पिवळी : ६००-८००, ओले बोंबील : ८०-१६०.

कोळंबी : लहान : १२०-२४०, मोठी : ३२०-४२०, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ७००-८००, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : ३५०-४००, मांदेली : १२०-१८०, राणीमासा : २००-२८०, खेकडे : ३००-३६०, चिंबोर्‍या : ५५०-७५०. खाडीची मासळी - सौंदाळे : २४०-२८०, खापी : २४०-२८०, तांबोशी : ४८०-७००, पालू : ३००-३५०, लेपा : २५०-३००, बांगडा : १६०-३२०, शेवटे : २५०-३००, बेळुंजी : १२०-१६०, तिसर्‍या : २५०-३००, खुबे : १२०-१६० तारली : २५०-३००.

नदीतील मासळी : रहू : १४०-१८०, कतला : १८०-२२०, मरळ : ३५०-४५०, शिवडा : २००-२५०, खवली :२५०-३००, आम्ळी : १२०-१८०, खेकडे : २५०-४००, वाम : ४५०-५००. मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २००, लेगपीस २५०, जिवंत कोंबडी १४०, बोनलेस ३००. अंडी : गावरान (शेकडा) ११०० डझन १४०, प्रतिनग १२. इंग्लिश (शेकडा) ५६०, डझन ७८, प्रतिनग ६.५०

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT