Fish  Pudhari
पुणे

Pune Fish Market Prices: पुण्यात मासळीच्या दरात तेजी कायम; चिकन महागले, इंग्लिश अंडी स्वस्त

पूर्व किनारपट्टीवरील मासेमारी बंदीचा परिणाम; गणेश पेठ बाजारात पश्चिम किनारपट्टीवरील मासळीची वाढती आवक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशाच्या पूर्व किनारपट्टीवर मासेमारी बंदी लागू झाल्याने गणेश पेठ येथील मासळीबाजारात पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक होत आहे. बाजारात होत असलेल्या मागणीनुसार व्यापारी वर्ग मासळी मागवित आहे. परिणामी, मासळीचे तेजीतील दर कायम आहेत.

उन्हाचा चटका वाढल्याने पक्ष्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी झाले असून पाण्याचे सेवन वाढले आहे. त्यामुळे पक्ष्यांची वाढ व तयार होण्याची प्रक्रिया दोन ते तीन दिवसांच्या विलंबाने होत आहे. परिणामी, बाजारात पक्ष्यांचा पुरवठा घटला असून चिकनच्या दरात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक असल्याने इंग्लिश अंड्यांचे दर शेकड्यामागे दहा रुपयांनी कमी झाले. मात्र, गावरान अंडी आणि मटणाचे दर स्थिर आहेत.

गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 11) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 400 किलो आणि नदीच्या मासळीची 600 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 15 टन इतकी आवक झाली होती.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1600-800, मध्यम : 1400-1500, लहान : 1100-1200, भिला : 900-1000, हलवा : 800-1000, सुरमई 800-1200, रावस : 800-1000, घोळ : 800-1000, करली : 350-400, करंदी (सोललेली) : 400-450, भिंग : 400-450, पाला : 1200-1400, वाम : पिवळी 900-1100, काळी : 300-400, ओले बोंबील : 350-450. कोळंबी : लहान : 250-360, मध्यम : 350-500, मोठी : 550-750, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-400, मांदेली : 120-160, राणीमासा : 250-300, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-1000.

खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 450-500, तांबोशी : 550-650, पालू : 250-300, लेपा : 350-400, बांगडा : 250-300, शेवटे : 350-400, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150-200, तारली : 200-250. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 180-240, मरळ : 350-450, शिवडा : 200-250, खवली : 200-250, आम्ळी : 120-180, खेकडे : 250-400, चिलापी : 80-180, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 250, लेगपीस 320, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 350. अंडी : गावरान (शेकडा) 1120 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 570, डझन 78, प्रतिनग 6.50.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT