Fish  Pudhari
पुणे

Pune Fish Market Prices: थंडीचा फटका; पुण्यात मासळी व चिकन महाग, अंडी स्वस्त

गणेश पेठ मासळी बाजारात आवक घटली; मागणी वाढल्याने भावात वाढ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: थंडीचा परिणाम मासेमारीवर होऊ लागल्याने गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळीची आवक घटली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मासळीच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. चिकनच्या दरात घट झाल्याने मागील काही महिन्यांत कंपन्यांनी उत्पादन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सध्या बाजारात पक्ष्यांचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.

त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने आठवडाभरात चिकनच्या भावात किलोमागे वीस रुपयांनी वाढ झाली आहे. याउलट अंड्यांच्या भावात शेकड्यामागे वीस रुपयांनी घसरण झाली आहे. मटणाचे भाव स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

बाजारात रविवारी (दि. 28) खोल समुद्रातील मासळी 15 ते 20 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 300 ते 400 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 20 ते 25 टन इतकी आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 2000-2200, मोठे : 1500-1800, मध्यम : 1200-1400, लहान : 1000-1300, भिला : 800-900, हलवा : 600-750, सुरमई 600-900, रावस : 700-1000, घोळ : 800-900, करली : 300-400, करंदी : 400-450, भिंग : 350-400, पाला : 700-1500, वाम : पिवळी 900- 1400, काळी : 400-500, ओले बोंबील : 250-350. कोळंबी : लहान : 200-350, मोठी : 400-700, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 900-1000, लॉबस्टर : 2000-2500, मोरी : 300-400, मांदेली : 100-200, राणीमासा : 250-300, खेकडे : 400-480, चिंबोऱ्या : 600-700.

खाडीची मासळी:

सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 600-800, तांबोशी : 500-600, पालू : 250-300, लेपा : 150-350, बांगडा : 180-250, शेवटे : 300-350, पेडवी : 150, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150, तारली : 150-250. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 180-250, मरळ : 350-450, शिवडा : 250, खवली : 200-250, आम्ळी : 120-180, खेकडे : 250-400, चिलापी : 60-180, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 250, लेगपीस 300, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1310 डझन 168, प्रतिनग 14. इंग्लिश (शेकडा) 715, डझन 96, प्रतिनग 8.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT