पुणे: गणेश पेठ येथील मासळी बाजारात पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून मासळीची कमी प्रमाणात आवक होत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे मासळीची खरेदी-विक्री मंदावली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी चांगली असल्याने गत आठवड्यातील तेजीतील दर टिकून आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम कोंबड्यांच्या वाढीवर झाला आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत दर्जेदार पक्ष्यांची उपलब्धता कमी प्रमाणात होत असल्याने चिकनच्या भावात किलोमागे वीस रुपयांची वाढ झाली आहे.
बाजारात होत असलेल्या पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने इंग्लिश अंडीच्या दरात शेकड्यामागे दहा रुपयांची वाढ झाली आहे. गावरान अंडी आणि मटणाचे दर स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले. रविवारी बाजारात (दि. 15) खोल समुद्रातील मासळी 12 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 150 ते 200 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 15 ते 20 टन इतकी आवक झाली होती.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):
पापलेट : कापरी : 1600-1800, मोठे : 1800-2000, मध्यम : 1300-1400, लहान : 1200, भिला : 900-1000, हलवा : 700-800, सुरमई 1000-1200, रावस : 800-900, घोळ : 900-1000, करली : 350-400, करंदी : 450, भिंग : 350-400, पाला : 1200-1400, वाम : पिवळी 600-1200, काळी : 350-400, ओले बोंबील : 350-450.
कोळंबी : लहान : 350-450, मोठी : 480-700, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 700-800, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-400, मांदेली : 100-140, राणीमासा : 200-280, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 650-700. खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 300-350, नगली : 550-600, तांबोशी : 550-600, पालू : 250-300, लेपा : 350, बांगडा : 250-300, शेवटे : 250-300, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-320, खुबे : 150-200, तारली : 200-250.
नदीतील मासळी : रहू : 140-200, कतला : 180-300, मरळ : 350-450, शिवडा : 250-300, खवली : 250-300, आम्ळी : 120-200, खेकडे : 250-400, चिलापी : 60-160, वाम : 500-550. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 280, लेगपीस 320, जिवंत कोंबडी 200, बोनलेस 360. अंडी : गावरान (शेकडा) 1120 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 475, डझन 66, प्रतिनग 5.50.