Elections Voting Pudhari
पुणे

Pune Cooperative Society Elections Restart: पुणे जिल्ह्यात १,१५४ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा सुरू

शहरातील ३४३ व ग्रामीण भागातील ८११ संस्थांचा समावेश; साखर कारखाने व विकास सोसायट्यांच्या निवडणुकांची रंगत वाढणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी दिले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण 1 हजार 154 सहकारी संस्थांचा समावेश असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातून देण्यात आली. त्यामध्ये पुणे शहरातील प्रलंबित असलेल्या 343 सहकारी संस्था आणि पुणे ग््राामीण/जिल्ह्यातील 811 सहकारी संस्थांचा समावेश असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील ‌‘अ‌’ वर्ग सहकारी संस्थांच्या प्रलंबित यादीनुसार पाच संस्थांचा समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य केडरायझेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी (सदाशिव पेठ, पुणे), महाराष्ट्र राज्य महिला संस्थांचा महासंघ मर्यादित, द्वारा : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे यांचा समावेश आहे. याशिवाय दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची दिनांक 20 मे 2020 रोजीच संपलेली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेला निवडणूक निधी भरला न गेल्याने ही निवडणूक प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक 13 ऑक्टोबर 2026, तर इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी संपत आहे. सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झालेला असला, तरी पावसाळा सुरू झाल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडतात. त्यामुळे याच वर्षातील दुसऱ्या टप्प्यात सोमेश्वर आणि कर्मयोगी साखर कारखान्याची निवडणूक अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

गावगाड्यातील कारखाने, विकास सोसायट्यांच्या निवडणुकांची रंगत

पुणे शहरातील निवडणुकांमध्ये अ वर्ग 2, ब वर्गात 20, क वर्गात 208 आणि ड वर्गात 113 मिळून 343 सहकारी संस्थांचा समावेश आहे. तर, पुणे ग््राामीणमधील प्रलंबित संस्थांमध्ये अ वर्गातील 1, ब वर्गात 39, क वर्गात 489 आणि ड वर्गातील 282 मिळून 811 सहकारी संस्थांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा खाली बसला आहे. आता गावगाड्यातील साखर कारखाने, विकास सोसायट्यांच्या निवडणुकांची रंगत यानिमित्ताने पाहावयास मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT