पुणे: पुण्यातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील कटऑफ गुणांमध्ये 8 ते 14 गुणांची मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ 470 ते 480 गुणांच्या पुढे गेले असून, दहावीचा वाढलेला निकाल, सीबीएसई-आयसीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांची संख्या आणि मर्यादित जागा यामुळे प्रवेशासाठी चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.
बीएमसीसीने वाणिज्य शाखेत पुन्हा आघाडी कायम ठेवत 482 गुणांचा कटऑफ नोंदवला. फर्ग्युसन कॉलेजच्या कला शाखेचाही कटऑफ 482 पर्यंत पोहोचला आहे. विज्ञान शाखेत महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे ज्युनिअर कॉलेज, एसपी कॉलेज, एमईएस गरवारे कॉलेज, नेस वाडिया महाविद्यालय आणि मॉडर्न कॉलेज यांसारख्या महाविद्यालयांमध्ये मोठी स्पर्धा दिसून आली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत बहुतांश महाविद्यालयांचे कटऑफ 8 ते 14 गुणांनी वाढले आहेत. विद्यार्थ्यांचा विज्ञान आणि वाणिज्य शाखांकडे वाढता कल, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या यामुळे कटऑफमध्ये वाढ झाल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
कॉलेजनिहाय शाखानुसार कटऑफ 2026
महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान
फर्ग्युसन कॉलेज: 482, 474, 478
बीएमसीसी: 482
एमईएस गरवारे कॉलेज: 458, 465, 478
नौरोसजी वाडिया कॉलेज: 448, 462, 477
मॉडर्न कॉलेज: 445, 460, 475
सिम्बायोसिस ज्यु. कॉलेज: 442, 468, 474
एसपी कॉलेज: 450, 464, 472
नेस वाडिया कॉलेज: 470
एमटीईएस ज्यु कॉलेज: 452, 466, 481
कटऑफ तुलना
महाविद्यालय शाखा 2025 2026 वाढ
बीएमसीसी वाणिज्य: 472 482 +10
फर्ग्युसन कॉलेज कला: 474 482 +8
गरवारे कॉलेज विज्ञान: 468 478 +10
नौरोसजी वाडिया विज्ञान: 466 477 +11
मॉडर्न कॉलेज विज्ञान: 462 475 +13
सिम्बायोसिस विज्ञान: 461 474 +13
एसपी कॉलेज विज्ञान: 458 472 +14
नेस वाडिया कॉलेज वाणिज्य: 459 470 +11