पुणे: वाचकांसाठी पुस्तकांची 800 दालने, मुलांसाठी चिल्ड्रेन कॉर्नर, युवक-युवतींसाठी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, श्रोत्यांसाठी पुणे लिटरेचर फेस्टिव्हल आणि खवय्यांसाठी 40 पेक्षा अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल अशा विविधतेने नटलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचे शनिवार, 13 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात सर्व भारतीय भाषांमधील पुस्तके खरेदीसाठी उपलब्ध राहणार असून, या पुस्तकांच्या खरेदीवर 10 टक्के सवलत राहणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देऊन, वाचनसंस्कृतीला वाढवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
पांडे म्हणाले की, पुणे पुस्तक महोत्सवाची सर्व तयारी झाली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 13 ते 21 डिसेंबरदरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पुणे शहरातील विविध महाविद्यालयांच्या वतीने ज्ञान सरिता ग््रांथ दिंडी काढण्यात येणार आहे. ही ग््रांथदिंडी भारतीय ज्ञानप्रणाली (आयकेएस) या संकल्पनेवर आधारित राहणार असून, त्यात शहरातील 75 महाविद्यालयांच्या विविध विषयांवर दिंड्या राहणार आहेत. या दिंडीची सुरुवात दुपारी अडीच वाजता मॉडर्न महाविद्यालयातून होऊन ती जंगली महाराज रस्त्याने फर्ग्युसन महाविद्यालयात सायंकाळी 5 च्या सुमारास पोहोचेल.
त्यानंतर सात हजार विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहतील. ग््रांथदिंडीत सहभागी झालेले विद्यार्थी तसेच सहभागी झालेल्या महाविद्यालयांना त्यांच्या ग््रांथालयासाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी काही कूपन देण्यात येणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवात सर्वांसाठी प्रवेश मोफत असून, नागरिकांना सकाळी 10 ते रात्री 10 या कालावधीत आवडत्या पुस्तकांची खरेदी 10 टक्के सवलतीच्या दरात करता येईल, असे पांडे यांनी सांगितले.
पुणे पुस्तक महोत्सवाची वैशिष्ट्ये
पुस्तकांच्या 800 दालनांमध्ये सर्व भारतीय भाषांची विविध विषयांवर पुस्तके उपलब्ध भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर विशेष दालन पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आनंदमठ पुस्तक आणि खाऊ भेट देण्यात येईल. नामांकित प्रकाशनाच्या पुस्तकांचे दररोज प्रकाशन प्रकाशकांकडून चर्चासत्र आणि साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन.
लेखकांसाठी ऑर्थर कॉर्नर चिल्ड्रेन कॉर्नरमध्ये सकाळपासून विविध स्पर्धा, उपक्रम आणि कार्यशाळा शनिवारी 13 डिसेंबरपासून दररोज सायंकाळी विनामूल्य सांस्कृतिक कार्यक्रम पुणे लिटरेचर फेस्टिव्हल 16 डिसेंबरपासून होणार असून, सकाळी 11 वाजतापासून साहित्यिक संवाद आणि कार्यक्रम.