पुणे : मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवर खापर फोडलं आहे. "व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासणं आणि नकार देणं गरजेचं होतं. अधिकाऱ्यांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नाही," असे पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी म्हटले आहे.
संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी त्यांनी अधिकाऱ्यांवर टाकलेली आहे. या प्रकरणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारला फटकारले होते आणि उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा (पार्थ पवार) आहे म्हणून त्यांचे नाव एफआयआरमध्ये घातले नाही का, अशी विचारणा केली होती. पार्थ पवार यांचे नाव या प्रकरणात चर्चेत असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र इतर लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असले तरी व्यवहार रद्द झाला आहे.