Gold Price Hike : चांदीनंतर सोन्याचा दरही 2.50 लाखांवर पोहचणार...? रुपया कमकुवत होण्याचा आहे संबंध

दराचा नवा उच्चांक; आंतरराष्ट्रीय बाजारातील दर भडकले
Gold Price Hike
Gold Price HikePudhari
Published on
Updated on

नवी मुंबई/पुणे ः डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन, आंतरराष्ट्रीय सोने-चांदी दरात झालेली वाढ, यामुळे सोने आणि चांदीच्या दराने शुक्रवारी (दि. 12) नव्या उच्चांकाची नोंद केली. चांदीचा प्रतिकिलो दर 2 लाख 1 हजार रुपयांवर गेला असून, 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 1 लाख 37 हजार रुपयांच्या पार गेला. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा 10 ग्रॅमचा किरकोळ बाजारातील दर 1 लाख 33 हजार 500 रुपये असून, जीएसटीसह रक्कम 1 लाख 37 हजार 500 रुपये होते, तर 22 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह भाव 1 लाख 26 हजार 500 रुपयांवर गेला आहे.

Gold Price Hike
1500 Year Old Gold Jewelry | पेरूमधील 1,500 वर्षांपूर्वीचा नाकातील सोन्याचा दागिना!

सोने अडीच लाखांवर जाणार

गेल्या वर्षभरात सोने तोळ्यामागे तब्बल 32 हजार रुपयांनी महाग झाले. मात्र 2026 या वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत सोने जीएसटी वगळता प्रती तोळे अडीच लाख आणि चांदीचा एक किलोचा दर हा अडीच लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केली.

चांदी 1 लाख 52 हजार रुपये किलो असून चांदीचे हे दर सोन्याच्या बरोबरीनेच असणार असून चांदी देखील अडीच लाख रुपये किलोपर्यंत तेजीत येईल, असे ते म्हणाले. शुक्रवारी रोजी मुंबई सराफ बाजारात सोने 1 लाख 35 हजार रुपये तोळे होते.जीएसटी, घडणावळसह एक तोळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1 लाख 38 हजार 50 रुपये सराफ बाजारात मोजावे लागले. गेल्या वर्षी जानेवारीत सोने 1 लाख 3 हजार रुपये तोळ्याचा दर होता. म्हणजेच वर्षभरात सोने तोळ्यामागे तब्बल 32 हजार रुपयांनी महागले. हेच दर नवीन वर्षात आणखी भरमसाट वाढतील. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या दरात दररोज वाढ होत राहणार असून सराफ बाजाराला तेजी कायम राहणार आहे.

Gold Price Hike
Gold Price Prediction | पुढील ६ महिन्यांत सोन्याचा दर किती वाढेल? वाचा वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा रिपोर्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news