Pune Municipal Jumbo Inauguration: आचारसंहितेच्या तोंडावर जम्बो उद्घाटने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 3 हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ; स्थायी समितीत 390 कोटींना मंजुरी
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होईल. 15 डिसेंबरनंतर आचारसंहिता लागण्याची चिन्हे असून, त्यानुसार नव्या वर्षांच्या सुरुवातीला 14 किंवा 15 जानेवारी रोजी मतदान होऊ शकते. शहरात गेल्या काही दिवसांत मार्गी लागलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करून घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. तब्बल 3 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटने येत्या सोमवारी (दि 15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकाच कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजप व महापालिकेतर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे सुरू आहे.

Pune Municipal Corporation
Purandar Onion Crop Disease: पुरंदरमध्ये दाट धुक्यामुळे कांदापिकावर रोगराई

महापालिकेचे सभागृह 14 मार्च 2022 रोजी मध्यरात्री विसर्जित झाले आणि त्यानंतर निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, या निवडणुका गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडल्या आहेत. महापालिकेवर सध्या प्रशासकराज आहे. आयुक्तच प्रशासकाची भूमिका निभावत आहेत. राज्यातील इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावरील सुनावणीत 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन 14 डिसेंबरला संपताच निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहरातील निवडणूकपूर्व हालचालींना जोर आला आहे.

Pune Municipal Corporation
Gold Price Hike : चांदीनंतर सोन्याचा दरही 2.50 लाखांवर पोहचणार...? रुपया कमकुवत होण्याचा आहे संबंध

प्रशासक काळात पूर्वी मंजुरी मिळालेल्या तसेच पाठपुरावा केलेल्या अनेक कामांना गती मिळाली आहे. पूर्णत्वास गेलेल्या या प्रकल्पांचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यात सत्ताधारी भाजपने विशेष पुढाकार घेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात विविध विकासकामांच्या उद्घाटनाची तयारी केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येणार असून शहराच्या मध्यवर्ती भागांसह विविध उपनगरांतील प्रकल्पांचा समावेश असलेल्या तब्बल 3 हजार कोटींपेक्षा अधिक प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यकम म्हणजे भाजपचे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी महापालिका प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Pune Municipal Corporation
Sugar Factories Loan Deduction Bill: कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम ऊस बिलातून कपात करू नये

या कामांचे होणार उद्घाटन

महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीतील अ आणि ब विंग, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाची नवी इमारत, खराडी, चांदणी चौक व बाणेर येथील अग्निशामक केंद्रे, विविध सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, आपत्ती व्यवस्थापनासाठीचे इंटिग््रेाटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, जागतिक सायकल स्पर्धेसाठी केलेले 75 किमीचे रोड नेटवर्क, समान पाणीपुरवठा योजनेतील पूर्णत्वास गेलेले 40 झोन तसेच काही दवाखाने व आरोग्य केंद्रांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

Pune Municipal Corporation
PMC Election History: पालिकेच्या सभागृहाने पाहिले तत्त्वनिष्ठ अन्‌ तत्त्वभष्टही

या कामांचे होणार भूमिपूजन

कार्यक्रमात बिंदुमाधव ठाकरे चौकातील उड्डाणपूल व ग््रेाड सेपरेटर, आचार्य आनंदऋषिजी महाराज (विद्यापीठ) चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन तसेच ग््रेाड सेपरेटरचे भूमिपूजन, पाणीपुरवठ्याचे विविध प्रकल्प आणि वडगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजन अशा सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांच्या नव्या कामांची मुहूर्तमेढही रोवली जाणार आहे.

Pune Municipal Corporation
PMC Election: नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का? भाजपसमोर उमेदवारीची कसोटी

जाता जाता 390 कोटींच्या 88 प्रस्तावांना आयुक्तांची मंजुरी

महापालिका निवडणुकीसाठी 16 डिसेंबरनंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीपूर्वी दिवसभर विविध निविदांना मंजुरीसाठी गती देण्यासाठी शुक्रवारी धावपळ सुरू होती. सायंकाळी झालेल्या बैठकीत तब्बल 390 कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे निवडणुकीपूर्वी स्थायी समितीत कोट्यवधी रुपयांची उड्डाणे झाल्याची चर्चा रंगली. सायंकाळी पावणेसहा वाजता आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक सुरू झाली. या बैठकीत एकूण 88 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यात शहरातील कचरा संकलनासाठी 340 छोट्या घंटागाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. यासोबत 12 संगणक आणि 11 बिन-लिफ्टर घेण्याचाही समावेश आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी पुढील पाच वर्षांत 284 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला. तसेच मेकॅनिकल ट्रान्सफरच्या पाच वर्षांच्या 22 कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत वृक्षलागवडीसाठी सुमारे 2 कोटींच्या निविदेलाही हिरवा कंदील देण्यात आला. याशिवाय इतर विविध विभागांच्या प्रस्तावांसह एकूण 88 कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news