पुणे

पुणे अपघात : कार झाडावर आदळून तरुणाचा मृत्यू

स्वालिया न. शिकलगार

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा

दुचाकीस्वाराला वाचवताना कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. (पुणे अपघात) या अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद गावच्या हद्दीत बुधवारी (दि. १) डसायंकाळी आठच्या सुमारास घडला. अल्पेश रफिक मोमीन (वय-२२, रा. पिंपरीपेंढार) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की, (पुणे अपघात) मारुती एसएसफोर (एमएच ०१ एमई ३५५०) मधून अल्पेश रफिक मोमीन व त्याचा मित्र जावेद इनुस शेख नगर-कल्याण महामार्गाने आळेफाट्याकडे येत होते. दरम्यान, पाऊस सुरु असताना अचानक त्यांच्या गाडीला दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचवताना त्यांची गाडी महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

यामध्ये पिंपरीपेंढार येथील अल्पेश रफिक मोमीन (वय-२२) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या मित्र जावेद शेख गंभीर जखमी झाला. जावेदवर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अल्पेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती अचानक जाण्याने पिंपरीपेंढार गावात हळहळ व्यक्त होत आहे.

SCROLL FOR NEXT