150 NDA Passing Out Parade Pudhari
पुणे

NDA Passing Out Parade: एनडीए 150 वा दीक्षांत समारंभ; खडकवासला येथे 353 कॅडेटचे भव्य संचलन

लष्कर, नौदल आणि वायुदलात प्रवेशासाठी कॅडेट रवाना; जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी घेतली मानवंदना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या खडकवासला येथील क्षेत्रपाल मैदानावर शनिवारी १५० व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ जल्लोषात पार पडला. यावेळी एकूण ३५३ कॅडेटने तीन वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत एनडीएच्या बँडच्या सुमधुर धून मध्ये "कदम कदम बढाया जा" म्हणत अंतिम पथच्या दिशेने वाटचाल केली.

कॅडेट मयांक चौधरी याने यावर्षी संचालनाचे नेतृत्व केले. संचलनात एकूण १२५० कॅडेट सहभागी झाले होते.चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र दिवेदी यांनी संचलनाची पाहणी करत विविध स्कॉडनची मानवंदना स्वीकारली. तीन चेतक हेलिकॉप्टर, सुपर डिमेनो विमान आणि सुखोई विमानांनी संचलन मैदानावरून उड्डाण करत मानवंदना दिली.

यंदा उत्तीर्ण झालेल्या ३५३ कॅडेट मधील २९२ जण लष्करात, ४३ जण नौदलात तर ८१ जण वायुदल मध्ये पुढील एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे.यात 18 मुली भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर गेल्या.भारताच्या मित्रदेशाच्या एकूण २४ कॅडेट ने देखील यावर्षी एनडीए मध्ये यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे. कॅडेट रोहित काजला यास सुवर्ण पदक, कॅडेट पीयुष रौतला यास रौप्य पदक तर कॅडेट साहिल शर्मा यास कांस्य पदक मिळाले. तसेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ बॅनर हा मानाचा पुरस्कार चार्ली स्कॉडन यांना प्राप्त झाला. याप्रसंगी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल उपेंद्र दिवेदी, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल संदीप जैन, एनडीएचे कमांडंट व्हाइस ऍडमिरल अनिल जग्गी,डेप्युटी कमांडंट एअर व्हाइस मार्शल राजेश वर्मा उपस्थित होते.

मी 42 वर्षांपूर्वी चा एनडीए चा विद्यार्थी....

यावेळी मार्गदर्शन करताना लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र दिवेदी म्हणाले, ४२ वर्षापूर्वी मी एनडीए मधून प्रशिक्षण पूर्ण केले आणि आज याठिकाणी उपस्थित आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.१२ मित्रदेशातील २४ कॅडेट आज प्रशिक्षण पूर्ण करतात ही इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचे दृष्टीने महत्वपूर्ण गोष्ट आहे.

ऑपरेशन सिंदूरने निर्माण केला आदर्श...

महिला कॅडेट चा अभिमान...

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण एखाद्या हल्ल्याला कशाप्रकारे खंबीरपणे प्रत्युत्तर देतो याचे प्रतीक आहे. कॅडेटने कौशल्य, सामर्थ्य, अनुकूलनक्षमता आणि सर्वांगीण दृष्टिकोन हे गुण बाळगणे आवश्यक आहे.महिला कॅडेट या देखील खडतर प्रशिक्षण पूर्ण करत असून त्यांना देखील पुरुष कॅडेट इतकाच समान दर्जा आहे. युद्ध क्षेत्रात महिला देखील आता नेतृत्व करण्यात मागे नाही ही आपल्यादृष्टीने कौतुकास्पद बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT