Career Guidance Pudhari
पुणे

Pune Campus To Career Guidance: ‘कॅम्पस टू करिअर’ उपक्रम; पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण करिअर मार्गदर्शन

10–12वी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, कॉलेज टूर आणि करिअर पर्याय याबाबत मार्गदर्शन; पालकांसाठीही उपयुक्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे योग्य अभ्यासक्रम आणि करिअरची निवड. परंतु, माहितीचा अभाव, प्रवेशप्रक्रियेतील गुंतागुंत आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक संभ्रमात पडतात. हीच गरज ओळखून विद्यार्थ्यांसाठी पुढारी माध्यम समूह आणि campus DEKHO AI च्या संयुक्त विद्यमाने 'कॅम्पस टू करिअर' हा संपूर्ण प्रवेश मार्गदर्शन उपक्रम राबविला जाणार आहे.

उपक्रम अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्याभ्यांसाठी आणि बारावीनंतर करिअरची दिशा ठरवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या उपक्रमामध्ये दहावीनंतर अकरावीमध्ये प्रवेश येणाऱ्या विद्याध्यर्थ्यांना शैक्षणिक प्रवाहांची माहिती, प्रवेशप्रक्रिया, विषयनिवड आणि पुढील शिक्षणाच्या संधी याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल. विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांमधील पर्याय समजावून सांगत विद्यार्थ्यांची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा समतोल साधून निर्णय घेण्यास मदत केली जाईल. तसेच, अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी मदत केली जाईल. सध्या बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय, बी. फार्मसी, व्यवस्थापन, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी लागणाऱ्या संपूर्ण प्रवेशप्रक्रियेचे मार्गदर्शन या उपक्रमात समाविष्ट आहे.

प्रवेश परीक्षा, कट ऑफ, कॉलेजनिवड, अर्जप्रक्रिया, कागदपत्रे, आरक्षण, एकूण शुल्क आणि शिक्षण कर्ज यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर विद्यार्थ्यांना आणि पालकांना सविस्तर माहिती या उपक्रमाअंतर्गत दिली जाणार आहे. या प्रकल्पाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातील नामांकित महाविद्यालयांची 'कैम्पस टूर' हे आहे. केवळ कागदोपत्री माहिती न देता प्रत्यक्ष कॉलेजचे वातावरण, सुविधा, प्रयोगशाळा, वसतिगृहे आणि शैक्षणिक संस्कृती विद्यार्थ्यांना अनुभवता यावी, या उद्देशाने कॅम्पस टूरचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य कॉलेज निवडण्यास मोठी मदत होऊ शकेल. ही सुविधा बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. A कैम्पस टू करिअर' उपक्रमात तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

करिअर काउन्सेलिग, योग्य अभ्यासक्रम निवड, प्रवेशातील अडथळे आणि भविष्यातील संधी याबाबत एकाच विकाणी मार्गदर्शन मिळणे, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. यासाठी सर्व विषयांतील विशेष तज्ज्ञांची समिती काम करीत आहे. प्रक्रियेचा भाग असणारे उज्ज्ञ शिक्षक, मार्गदर्शक यांच्याकडून विशेष सत्रांमधून विद्यार्थ्यांना आणि आवश्यकतेनुसार पालकांनाही मार्गदर्शन केले जाणार आहे.

सद्यःस्थितीत शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा वाढत असताना योग्य माहिती आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देतो. त्यामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी, बारावी पूर्ण करीत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासाठी 'कॉम्पस टू करिअर' हा उपक्रम मार्गदर्शक ठरत आहे. "मिशन अॅडमिशन चला, करिअरला योग्य दिशा देऊया" हा संदेश या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचवला जाणार आहे.

संस्थाही होऊ शकतात सहभागी...

  • या उपक्रमात शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, प्रवेश मार्गदर्शन करणाऱ्या संस्था, खासगी क्लासेस, तसेच शैक्षणिक कर्जसुविधा देणाऱ्या बँका आणि शिक्षणाशी संबंधित संस्था, घटक सहभागी होऊ शकतील.

  • सहभाग नोंदविण्यासाठी संबंधित संस्थांनी दिलेल्या संपर्क मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे सोबत दिलेल्या स्कॅन कोडच्या माध्यमातूनही सहभाग नोंदणी करता येईल.

  • अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९८५०९७९०९८

प्रकल्पात सहभागी होण्यासाठी

  • प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक फॉर्म उपलब्ध करून दिला आहे. तो फॉर्म भरून जवळच्या पुढारी कार्यालयात पाठवायचा आहे. फॉर्म पुढारीच्या १४ फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे.

  • अधिक माहितीसाठी संपर्क क्रर्माक: ९५७००१७००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT