Pune NICU Kamla Nehru: पुण्यात कमला नेहरू रुग्णालयाचे NICU विभाग; नवजात बालक मृत्यूदर ०.५% वर

गेल्या वर्षात १,९५५ नवजात बालकांचे मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार; आर्थिक दुर्बल कुटुंबांसाठी दिलासादायक
Newborn Baby
Newborn BabyPudhari
Published on
Updated on

पुणे: महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारीनुसार नवजात अतिदक्षता विभागातील मृत्युदरात सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट होते. बालमृत्यूदर 2020 मध्ये 3.1 टक्के होता, या वर्षी तो अवघ्या 0.5 टक्क्यांवर आला आहे. या विभागात गेल्या एका वर्षात तब्बल 1,955 नवजात बालकांवर उपचार करण्यात आले आहेत.

Newborn Baby
Pune Water Dues: पुणे महापालिकेची ९३३ कोटी रुपयांची पाणी थकबाकी, पुरवठा धोक्यात

खासगी रुग्णालयील नवजात अर्भकांवरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जातो. नवजात बालकाच्या आजाराच्या तीवतेनुसार बाळाला आयसीयूमध्ये किती दिवस ठेवायचे, हे ठरवले जाते. त्यानुसार खर्चाचे घड्याळही वेगाने धावते. सामान्यांना हा खर्च परवडणारा नसतो. मात्र, कमला नेहरू रुग्णालयात नवजात बालकांचे उपचार मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी हा विभाग मोठा आधार ठरत आहे. कमला नेहरू रुग्णालयाच्या ‌‘एनआयसीयू‌’मध्ये 20 खाटा उपलब्ध आहेत. यांपैकी 16 खाटा ऑक्सिजनसह आणि चार खाटा व्हेंटिलेटरसह सुसज्ज आहेत.

Newborn Baby
Pune Dog Registration: पुण्यात पाळीव श्वानांच्या नोंदणीत मोठा विसंगती

डॉक्टर आणि परिचारिकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवजात बाळांचे उपचार घेण्याचे प्रमाण वाढत आहे आणि मृत्यूदरही लक्षणीयरीत्या घटला आहे, अशी माहिती डॉ. स्मिता सांगडे यांनी दिली. वर्षभरात उपचार घेतलेल्या 1,955 नवजात बालकांपैकी सर्वाधिक 899 बालकांवर काविळीसाठी फोटोथेरपी उपचार करण्यात आले. त्याखालोखाल कमी वजनाची व मुदतपूर्व जन्मलेली 577 बालके होती. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या साहाय्याने 234 नवजात बालकांवर उपचार करण्यात आले. कमी वजनाच्या, कमी दिवसांच्या बाळांवर येथे आवश्यकतेनुसार एक ते दीड महिना उपचार केले जातात. काही बाळांना जन्मत: कावीळ, शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे, श्वसनाचे विकार, फिट्‌‍स येणे, हृदयाचा विकार, व्यंग अशा आजारांवर एसएनसीयूमध्ये उपचार केले जातात.

Newborn Baby
Baramati Crime: 'आई मला ब्लॅकमेल केलं', बारामतीत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; PSI पिता- तरुणीविरोधात गुन्हा

नवजात बाळांसाठी विविध सुविधा

नवजात शिशूमध्ये आढळणारे जन्मजात दोष, दुर्मीळ त्वचाविकार किंवा कमी वजनाची, मुदतपूर्व जन्मलेली बाळे यांच्यासाठी विशेष उपचारांची गरज असते. अशा बाळांना महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात बाळांवरील उपचारांसाठी प्रयत्नांची शर्थ केली जात आहे. कमला नेहरू रुग्णालयात 20 खाटांचे एनआयसीयू कार्यरत आहे.

Newborn Baby
Maharashtra FRP Dues: थकीत एफआरपीप्रश्नी ४५ साखर कारखाने रडारवर; १,८६० कोटींची देणी प्रलंबित

आपल्याकडे बालरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, डोळ्यांचे तज्ज्ञ, कान-नाक-घसातज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ, पेडियाट्रिक सर्जन, त्वचारोगतज्ज्ञ, प्लास्टिक सर्जन उपलब्ध असल्यामुळे एनआयसीयूमध्ये बालकांवर चांगल्याप्रकारे उपचार करणे शक्य होते. बालकांचा मृत्युदरही आता एक टक्क्याहून कमी (0.5%) झाला आहे.

डॉ. प्रशांत बोठे, वैद्यकीय अधीक्षक

कमला नेहरू रुग्णालयात नवजात शिशू विभागात मुदतपूर्व जन्मलेली बालके, कमी वजनाची बालके, कावीळ झालेली बालके, जंतुसंसर्ग झालेली, मेंदूज्वर झालेली, झटका आलेली बालके, शरीरात साखरेचे प्रमाण कमी झालेली बालके, श्वसनाचा त्रास होणारी बालके, प्रसूतीदरम्यान गुदमरलेली बालके, आईच्या पोटात शी केल्यामुळे श्वसनाचा त्रास झालेली बालके, त्वचेचा अनुवंशिक आजार असलेली बालके यांच्यावर मोफत उपचार केले जातात.

डॉ. स्मिता सांगडे, बालरोगतज्ज्ञ, कमला नेहरू रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news