Pune Water Dues: पुणे महापालिकेची ९३३ कोटी रुपयांची पाणी थकबाकी, पुरवठा धोक्यात

जलसंपदा विभागाचा इशारा – थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा ताबडतोब खंडित
Water crisis
Water Pudhari
Published on
Updated on

पुणे / खडकवासला: पुणे महापालिकेकडे जलसंपदा विभागाची 933 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. शहराच्या पाणीवापरासाठी जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला 11.60 टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. हा कोटा येत्या पंधरा दिवसांत संपणार आहे. त्यामुळे आता महापालिका ही रक्कम भरेल की जलसंपदा विभाग पाणीपुरवठा खंडित करेल, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Water crisis
Pune Dog Registration: पुण्यात पाळीव श्वानांच्या नोंदणीत मोठा विसंगती

जलसंपदा विभागाच्या खडकवासला प्रकल्पातून पुणे शहरासाठी 11.60 टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या प्रकल्पातील एकूण 29 टीएमसी पाण्यापैकी बाष्पीभवन वगळता उर्वरित पाणी ग््राामीण भागातील शेतीसाठी सिंचनासाठी वापरण्यात येते. मात्र, जलसंपदा विभागाच्या म्हणण्यानुसार महापालिकेने 2024-25 या आर्थिक वर्षात मंजूर कोट्यापेक्षा एकूण 8.84 टीएमसी अतिरिक्त पाणीवापर केला आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या तरतुदीनुसार अतिरिक्त 25 टक्क्यांपर्यंत पाणीवापर केल्यास दीडपट, तर त्यापेक्षा जास्त वापर केल्यास पाणीवापर दराच्या तिप्पट दंड आकारला जातो.

Water crisis
Baramati Crime: 'आई मला ब्लॅकमेल केलं', बारामतीत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; PSI पिता- तरुणीविरोधात गुन्हा

महापालिकेकडून 2016 पासून अतिरिक्त पाणीवापर होत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे विभागाने महापालिकेला नियमानुसार दंड आकारणी केली आहे. महापालिकेकडे आतापर्यंत 952 कोटी 62 लाख रुपयांची थकबाकी होती. महापालिकेने नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांच्या पाणीपट्टीपोटी 19 कोटी 75 लाख रुपयांची रक्कम जलसंपदा विभागाकडे जमा केली आहे. तरीदेखील फेबुवारी अखेर महापालिकेकडे 932 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

Water crisis
Pune Drone Food Processing Cluster: पुण्यात ड्रोन व अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान क्लस्टरची शिफारस; उद्योगवृद्धीसाठी मोठे पाऊल

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 31 जानेवारीअखेर महापालिकेने 11.23 टीएमसी पाणीवापर केला आहे. उर्वरित 0.36 टीएमसी पाणीवापर येत्या 12 दिवसांत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वार्षिक मंजूर पाणीकोटा संपत आला असून, त्यानंतर खडकवासला धरणातून महापालिकेला पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे इतर उपलब्ध पाण्याच्या स्रोतांमधून आपल्या पातळीवर तरतूद करावी, अशी सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे. त्यामुळे महापालिकेने आतापर्यंतची 932 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी तत्काळ भरावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मंजूर पाणीकोटा संपल्यानंतर पाणीपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

Water crisis
Maharashtra FRP Dues: थकीत एफआरपीप्रश्नी ४५ साखर कारखाने रडारवर; १,८६० कोटींची देणी प्रलंबित

953 कोटी रुपयांच्या थकबाकीची पालिकेला नोटीस

गेल्या महिन्यातही जलसंपदा विभागाने 953 कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस महापालिकेला बजावली होती. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार महापालिका दरमहा केवळ दहा कोटी रुपयांची पाणीपट्टी जमा करत आहे.

पुणे महापालिका मंजूर पाणीकोट्यापेक्षा जास्त पाणीवापर करत आहे. त्यामुळे शेतीसाठी सिंचनाचे पाणी कमी पडत आहे. परिणामी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचा जलसंपदा विभागावर रोष आहे. महापालिकेने तातडीने थकबाकी भरावी; अन्यथा पाणीपुरवठा खंडित केला जाईल.

किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प, जलसंपदा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news