पुणे

पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला मोदी-टाटा यांची उपस्थिती

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामाच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक रतन टाटा उपस्थित राहणार आहेत.

पुणे महानगर प्राधिकरणाकडून या सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही हजेरी लावणार आहेत. डिसेंबरअखेरीस हा सोहळा करण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटरच्या मेट्रोचे काम आहे. या कामांचे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केले आहे.

मेट्रोसाठी लागणारी आवश्यक जागा ताब्यात घेण्यात आली आहे. विद्यापीठ रस्त्यावर 'इंटिग्रेटेड फ्लायओव्हर' बांधण्यात येणार असून, पहिल्या उड्डाणपुलावर दुचाकी व चारचाकी वाहनांना जाता येईल. त्यावरील उड्डाणपुलावरून मेट्रो धावणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT