पुणे: मराठी चित्रपटसृष्टीत प्रचंड गाजलेल्या 'मुळशी पॅटर्न'च्या यशानंतर आता मुळशी पॅटर्न-२ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट' अशी वेगळी आणि उत्सुकता वाढविणारी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
पुनीत बालन स्टुडिओ आणि अभिजित भोसले जेन्युन प्रॉडक्शन हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. युवा उद्योजक पुनीत बालन, अभिजित भोसले आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट' ही टॅगलाईन असल्याने या चित्रपटात नेमकी वाळूच्या संघर्षाची कथा पाहायला मिळणार की, मुळशी पॅटर्नप्रमाणेच वाळूमाफियांच्या वाढत्या जाळ्यावर आणि त्यामागील वास्तवावर भाष्य करण्यात येणार आहे, का सामान्य माणसाचे घराचे महाग होत चाललेले स्वप्न याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
ग्रामीण भागातील वास्तव, संघर्ष आणि व्यवस्थेतील काळी बाजू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार असून, मुळशी पॅटर्ननंतर दुसरा भाग कधी येणार याची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती ती आता संपणार आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून, तो नेमका कधी प्रदर्शित होणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, पहिल्या भागातील कोणते कलाकार पुन्हा दिसणार तसेच कथानकाची दिशा नेमकी काय असेल याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुळशी पॅटर्न-२ हा चित्रपट पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चित्रपटातील कलाकारांविषयी उत्सुकता, शूटिंग लवकरच सुरू
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार असून, मुळशी पॅटर्ननंतर दुसरा भाग कधी येणार याची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती ती आता संपणार आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून, तो नेमका कधी प्रदर्शित होणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. दरम्यान, या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, पहिल्या भागातील कोणते कलाकार पुन्हा दिसणार तसेच कथानकाची दिशा नेमकी काय असेल याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुळशी पॅटर्न-२ हा चित्रपट पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.