maharashtra state heaviest rainfall in 35 years pune district increase 1453 percent rainfall
पुणे : महाराष्ट्रात गेल्या 35 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस मे 2025 मध्ये पडला आहे. 1990 नंतरचा हा राज्यातील सर्वात मोठा पाऊस ठरला आहे. मे महिन्यात राज्यात अपवादात्मक मान्सूनपूर्व पाऊस पडला. रविवारी (दि. 25) सकाळीच मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे आत मात्र 24 मे पर्यंतचा पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा रेकॉर्डवर धरला जाणार आहे.
मे महिन्याचे आठ दिवस शिल्लक असतानाही पावसाचे प्रमाण ऐतिहासिक निकषांपेक्षा जास्त झाले आहे. 1 ते 24 मे 2025 दरम्यान, महाराष्ट्रात सरासरी 74.6 मिमी पाऊस पडला, जो 844 टक्के जास्त आहे. संपूर्ण मे महिन्यातील सरासरी 7.4 ते 11.4 मिमी इतकी आहे. त्यामुळे ही वाढ 844 टक्के इतकी नोंदवली गेली आहे.
1990 नंतर मे महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे, तेव्हा महाराष्ट्रात याच काळात 99.8 मिमी पाऊस पडला होता. येत्या काही दिवसांत राज्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदाचा पाऊस हा 1990 चा विक्रमही मोडू शकेल अशी शक्यता आहे. राज्यात मे महिन्यात सर्वाधिक पाऊस 1918 मध्ये 113.6 मिमी इतका नोंदवला गेला.
गेल्या तीन दशकांमधील महाराष्ट्रातील मे महिन्यातील पावसाच्या पद्धतींचे विश्लेषण केल्यास वर्षानुवर्षे लक्षणीय बदल दिसून आले आहेत, यावर्षी 74.6 मिमी पाऊस अलीकडील ट्रेंडपेक्षा नाट्यमय फरक आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की महाराष्ट्रात मे महिन्यात पाऊस सामान्यतः किरकोळ असतो, बहुतेक वर्षे या महिन्यात 10 ते 20 मिमी पेक्षा कमी पाऊस नोंदवला आहे. उल्लेखनीय अपवादांमध्ये 2006 (44.6 मिमी), 2021 (47.3 मिमी) आणि 1999 (34.2 मिमी) यांचा समावेश आहे.
2007 ते 2014 हा काळ विशेषतः कोरडा राहिला. या सर्व वर्षांतील मे महिन्यात 10 मिमी पेक्षा कमी पाऊस पडला.
या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसाला आणखी एक पैलू होता. महाराष्ट्रातील सुमारे 30 हजार हेक्टर शेत जमिनीवर असामान्यपणे झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा परिणाम झाल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यतील 1901 पासून मे महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड तपासला आता असे दिसते की, या महिन्यात आतापर्यंत 119.6 मिमी पाऊस पडला आहे. ही एकूण 1453 टक्के वाढ आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, अलिकडच्या पावसाने जिल्ह्यासाठी मे महिन्यातील मागील सर्व नोंदी ओलांडून मोठा विक्रम केला आहे.
1918 : 108.1 मिमी
1933 : 181.6 मिमी
1961 : 114.2 मिमी
1960 : 104.3 मिमी
1961 : 148.8 मिमी
पुणे : 154.7 : 458%
हवेली : 186.4 : 1921%
मुळशी : 121 : 696%
भोर : 160 : 717%
मावळ : 145.8 : 1104%
(वडगाव)
वेल्हा : 122.5 : 556%
जुन्नर : 105 : 1024%
खेड : 178 : 615.9%
(राजगुरुनगर)
आंबेगाव : 117.4 : 767%
(घोडेगाव)
शिरूर : 180.9 : 1021%
(घोदनदी)
बारामती : 220.9 : 928%
इंदापूर : 174.3 : 834%
दौंड : 224.6 : 1074%
पुरंदर : 196.8 : 891%
(सासवड).
पुणे जिल्हा : 168.5 : 748%
पुणे विभाग : 181.6 : 562%