

पुणे: पुणेकरांना यंदाच्या उन्हाळ्यात प्रचंड उकाडा सहन करावा लागला मात्र त्याचा फायदा असा झाला की मी मध्येच मोठ्या जलधारा पुणेकरांवर निसर्गाने बरसवल्या.शहरात गेल्या आठ दिवसांत 64 वर्षांतील विक्रमी पाऊस झाला तर तापमान चक्क 26 अंशावर खाली आले. मे महिन्यात या पूर्वी अशी स्थिती 1961 मध्ये झाल्याची नोंद आहे.
शहरात 17 मे पासून सतत पाऊस सुरू आहे. गत 9 दिवसांत शहरात 160 मी मी पाऊस मे महिन्यात यापूर्वी मे 1961 मध्ये झाल्याची नोंद हवामान विभागाकडे आहे. त्यावेळी शिवाजीनगर येथे मे महिन्यात एकूण 148.5 मी मी पाऊस झाला गेला होता. (Latest Pune News)
या वर्षी 25 मेपर्यंत 160 मिमी पेक्षाही जास्त पाऊस झाला तर हवेची गुणवत्ता ही अतिप्रादुषित मधून 220 वरून 40 वर खाली आली आहे. आहे.मे महिन्याच्या अजून आठ दिवस शिल्लक असल्याने हा पाऊस शंभर वर्षातील विक्रम मोडेल असे चित्र आहे
या आहेत विक्रमाच्या नोंदी..
पुणे वेधशाळे च्या नोंदीं नुसार यापूर्वी मे महिन्यात 1933 मध्ये मध्ये सर्वाधिक म्हणजेच 181.6 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर 1961 मे महिन्यात 148.8 मिलीमीटर पाऊस झाला होता. या वेळी 25 मेपर्यंत 160 मिमी पाऊस झाला आहे. मे अखेर पर्यन्त तो गत 100 वर्षांपूर्वी चे विक्रम मोडेल असा अंदाज आहे.