

पाटस: जिल्ह्यासाठी शनिवारी (दि २४) रात्री ऑरेंज ॲलर्ट दिला असताना दौंड तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. पाटस गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला जाऊन ओढ्याला पुर आल्याने येथील जनजीवन विस्कळित झाले आहे.
शनिवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार झालेल्या पावसामुळे पाटस -रोटी परिसरातील डोंगर परिसरातून पावसाचे पाणी गाव तलावात आल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरले गेला आहे.तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने तलाव सांडण्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून गावातून जाणाऱ्या ओढ्याला पूर आला आहे. (Latest Pune News)
गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा ओढा असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.ओढ्यातील पाणी गावातील मुख्य रस्त्यावर आल्याने त्या परिसरातील काही दुकाने व्यवसायिकांनी बंद ठेवली आहेत. गावातील रस्त्यावर आलेले पाणी सुरळीत करण्यासाठी ओढ्यावरील पुलामध्ये अडकलेला कचरा काढण्याचे काम पाटस ग्रामपंचायतकडून वेगाने सुरू केले आहे.