

पुणे: रविवारी (दि.25 मे रोजी) सकाळी 11 च्या सुमारास नैऋत्य मान्सून महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली.
रविवारी 25 मे 2025 रोजी पश्चिममध्य आणि पूर्वमध्य अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटकच्या काही भागात, संपूर्ण गोवा मान्सूनने प्रगती केली आणि सकाळी 11 च्या सुमारास महाराष्ट्राच्या तळ कोकणासह काही भागात दाखल झाला. (Latest Pune News)
तसेच तो पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि मिझोरामच्या काही भागात, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पुढे सरकला आहे. रविवारी सकाळीच मान्सून तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आला मान्सूनचा वेग पाहता ती अवघ्या तीन दिवसात पुणे,मुंबईसह अवघे राज्य व्यापेल असा अंदाज आहे.
दरवर्षी तो तळकोकणात 5 ते 6 जून पुण्यात 8 ते 10 जून ,मुंबईत 12 जून तर संपूर्ण राज्यात 15 ते 20 जूनपर्यंत येतो मात्र यंदा तो प्रचंड वेगाने अवघ्या 12 तासात केरळ ते गोवा मार्गे महाराष्ट्रात दाखल झाला.किमान 10 ते 12 दिवस आधीच तो तळकोकणात आला आहे.
मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, काही भागात नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. पुढील ३ दिवसांत मुंबई,पुणेसह अवघा महाराष्ट्र, बेंगळुरूसह कर्नाटक, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या भागात ल तो प्रगती करेल.असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील या पूर्वीच्या मान्सूनच्या आगमनाच्या तारखा
2011: 4 जून
2012: 6 जून
2013: 4 जून
2014: 11 जून
2015: 8 जून
2016: 19 जून
2017: 10 जून
2018: 8 जून
2019: 20 जून
2020: 11 जून
2021: 5 जून
2022: 10 जून
2023: 11 जून
2024: 6 जून
2025: 25 मे