Keshavnagar Ward Development Plan Pudhari
पुणे

Keshavnagar Ward Development Plan: केशवनगर प्रभाग होणार ‘स्मार्ट’; डॉ. दादा कोद्रे यांचा विकासाचा संकल्प

100 फुटी रस्ते, समान पाणीपुरवठा, कचरामुक्त परिसर व आधुनिक सुविधा उभारण्याचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: विकास आराखड्यावरील कार्यवाही रखडल्याने प्रभागातील बहुतांश प्रश्न प्रलंबित राहिले असून समस्या गंभीर झाल्या आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांची संख्या वाढत असल्याने मूलभूत समस्याही निर्माण करण्याची आहे. त्या अनुषंगाने येत्या काळात प्रभागात 100 फुटांपर्यंत मुख्य रस्ते, समान पाणीपुरवठा, कचरामुक्त प्रभाग, पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे, उद्याने, क्रीडांगणे तसेच स्मार्ट शाळा उभारण्यास प्राधान्य राहणार असल्याचा निर्धार केशवनगर-साडेसतरा नळी- शेवाळवाडी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक डॉ. दादा कोद्रे यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले माझे वडील माऊली अण्णा कोद्रे यांनी दिलेला समाजसेवेचा वारसा मी चालवित असल्याचा अभिमान असल्याचे कोद्रे अभिमानाने सांगतात.

दै. ‌‘पुढारी‌’ला त्यांनी सदिच्छा भेट देत प्रभागाच्या विकासाचा जाहीरनामा उलगडला. सन 1992 मध्ये मुंढवा महापालिका हद्दीत समाविष्ट झाले. केशवनगर हा महापालिकेजवळचा भाग असल्याने त्याठिकाणी रस्ते, पाणी, वीजपुरवठा आदी गोष्टी आणण्याकडे लक्ष माझे वडील माऊली कोंद्रे यांनी लक्ष दिले. ग््रुाप ग््राामपंचायत असताना याठिकाणी काँग््रेास आणि शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी काँग््रेासचा प्रभाव राहिला. मात्र, वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपशी संबंधित असल्याने त्यांना सत्तेत कधी संधी मिळाली नाही. ते नेहमी विरोधकाच्या भूमिकेत राहिले. त्यांच्यापासूनच मला समाजकारणासह राजकारणाची प्रेरणा मिळाली.

डॉक्टर झाल्यानंतर सद्भावना ग््रुापमार्फत वैद्यकीय शिबिर तसेच सद्भावना क्लिनिक सुरू केले. त्यामार्फत लोकांशी जोडत गेलो. 1997 ला 23 गावांचा समावेश झाला. त्यामध्ये 15 पूर्ण तर 5 अंशत: गावे समाविष्ट झाली. यामध्ये, केशवनगरला वगळण्यात आले. त्यामुळे परत याठिकाणी ग््राामपंचायतीचा कारभार सुरू झाला. संधी न मिळाल्याने 2012 पर्यंत कायम विरोधकाच्या भूमिकेत राहिलो. 2017 मध्ये आमदार योगेश टिळेकर यांच्या समवेत जोमाने कामाला सुरवात केली. त्यानंतर पत्नीला जिल्हा परिषदेवर संधी मिळाली.

महापालिकेचा पहिला नगरसेवक होण्यामागे प्रभागात केलेली समाजकामे ही महत्त्वाची ठरली. कोविडकाळात जनसेवा न्यासच्या माध्यमातून 75 हजार नागरिकांचे व्हॅक्सिनेशन, रक्तदान शिबिर, कॅटरॅक्ट तपासणी शिबिर आदी उपक्रमांचा फायदा झाला. या उपक्रमांमुळे बहुतांश लोकांपर्यंत मी पोहोचलो. निवडणुकांसाठी तिकीट मिळावेच अशी अपेक्षा नव्हती. मात्र, अन्य मागास प्रवर्गाची जागा सर्वसाधारण म्हणून झाल्याने त्यासाठी प्रयत्न केले आणि तिकीट मिळविण्यापासून विजयी होण्यापर्यंत त्यात यशस्वीही झालो. तिकीट मिळवितानाही संबंधितांना माझ्या कामाचे मूल्यमापन करा, योग्य वाटल्यासच मला तिकीट द्या असेही सांगितले. माझा विजय हा माझ्या कामाची पोचपावती मला वाटते.

...या समस्या सोडवून प्रभाग करणार स्मार्ट

  • मुख्य रस्ते शंभर फुटी रुंदीकरणासह उपरस्ते तयार करणार

  • समान पाणी पुरवठ्यासाठी प्रभागात पाण्याच्या टाक्यांची उभारणी

  • ‌‘स्वच्छ‌’च्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार

  • महापालिका तसेच पीपीपी स्तरावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणार

  • मुलांसाठी क्रीडांगणे, शाळा, उद्याने, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच्या अनुषंगाने बसथांबे तसेच प्रशस्त डेपो साकारणार

  • सीएसआर फंडातून समाजोपयोगी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT