Pune Municipal Election Analysis: वडगाव शेरीत भाजपचा झेंडा; चार नगरसेवक निवडून, संघटन ताकदीचा विजय

जुने चेहरे डावलून नव्यांना संधी देण्याचा निर्णय ठरला निर्णायक; माजी आमदार जगदीश मुळीक यांची रणनीती यशस्वी
Pune Municipal Election Analysis
Pune Municipal Election AnalysisPudhari
Published on
Updated on

माऊली शिंदे

वडगाव शेरी: वडगाव शेरी- कल्याणीनगर प्रभाग 5 मध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनेची वाढलेली ताकद, गावकऱ्यांसह इतरांना सोबत घेण्यात आलेले यश, विकासकामे यामुळे वडगाव शेरीमध्ये भाजपने चार नगरसेवक निवडून आणले. नगरसेवक योगेश मुळीक तिसऱ्यांदा या प्रभागातून निवडून आले. भाजपने पक्षातील जुन्या नगरसेवकांना डावलून, नवीन कार्यकत्यांना संधी दिली होती. भाजपचे उमेदवार देऊन निवडून आणण्यात माजी आमदार जगदीश मुळीक यशस्वी ठरले.

Pune Municipal Election Analysis
Pune 23 Villages Planning Authority Transfer: समाविष्ट 23 गावांचे नियोजन अधिकार अखेर मनपाकडे

गेल्या 12 वर्षांत वडगाव शेरीमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. कार्यकर्त्यांची संख्या इतर पक्षांपेक्षा जास्त आहे. त्याचा फायदा भाजपला प्रत्येक निवडणुकीत होतो. भाजपने 2026 च्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक संदीप जऱ्हाड आणि नगरसेविका सुनीता गलांडे यांना उमेदवारी दिली नाही. नगरसेविका कै. शीतल शिंदे यांचे निधन झाल्याने त्यांचे पती माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे उमेदवारी मागत होते. परंतु, ऐनवेळी राष्ट्रवादीचे नारायण गलांडे यांचा पक्षप्रवेश केला. योगेश मुळीक, नारायण गलांडे, कविता गलांडे आणि श्वेता गलांडे यांना भाजपने उमेदवारी दिली.

Pune Municipal Election Analysis
Rajgurunagar Chain Snatching Incident: चांडोली टोलनाक्यावर महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे गंठण पळवले

भाजपने जुन्या नगरसेवकांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना संधी दिल्याने माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यावर टीका झाली होती. तीन गलांडे उमेदवार दिल्याने भाजपचा पॅनेल पडेल, अशी चर्चा होती. पण, तरी जगदीश मुळीक हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. भाजपची वाढलेली ताकद, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नाराज कार्यकर्त्यांनी भाजपला दिलेली साथ, मुस्लिमसह इतर समाजाने भाजपला केलेली मदत.

Pune Municipal Election Analysis
Pune Valentine Day Rose Sales: पुण्यात व्हॅलेंटाईन डे स्पेशल: गुलाबांची विक्री धूम

निवडून येण्यासाठी केलेली अनुकूल प्रभागरचना, वडगाव शेरीतील गावकऱ्यांना आणि इतरांना एकत्र आणण्यात आलेले यश, यामुळे भाजपचा सहज विजय झाला. राष्ट्रवादीची चर्चा खूप झाली. राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची कामे चांगली होती. पण, तेवढ्या प्रमाणात मतदान झाले नाही. सचिन भगत यांचा निवडणुकीत अपेक्षित असा प्रभाव पडला नाही. ॲड. सतीश मुळीक यांनी उज्जैन यात्रा काढली. या यात्रेचा जास्त फायदा झाला नाही. शिवसेनेचे पॅनेल नसल्याने सारिका दळवी यांची लढत एकतर्फी ठरली.

Pune Municipal Election Analysis
Pune Divorce Trends: पुण्यात घटस्फोट वाढले; कौटुंबिक न्यायालय जोडपींना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न

... यांच्यात झाली लढत

या प्रभागात भाजपचे योगेश मुळीक, नारायण गलांडे, कविता गलांडे, श्वेता गलांडे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे संदीप जऱ्हाड, सुनीता गलांडे, रूपाली गलांडे, सचिन भगत तसेच महाविकास आघाडीचे राजेंद्र शिरसाट, सविता राऊत, ॲड. सतीश मुळीक आणि शिवसेनेतून सारिका दळवी अशी लढत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news