पुण्यातून सुरू झालेला इसिस कट; उघड झाल्या थरारक गोष्टी Pudhari
पुणे

ISIS module in Pune: पुण्यातून सुरू झालेला इसिस कट; उघड झाल्या थरारक गोष्टी

कोथरूडमध्ये दुचाकी चोरीप्रकरणातून सुरु झालेला तपास थेट 'एनआयए'पर्यंत; आयईडी, बॉम्बस्फोट, विदेशातून हुकूम यांचे धक्कादायक उघड!

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र कांबळे

पुणे : पुणे इसिस मोड्युल प्रकरणात अटक केलेल्या काही आरोपींचा सातारा दरोडा प्रकरणात सहभाग आढळला होता, त्यांना ‌‘एटीएस‌’ने अटक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात विविध 19 ठिकाणी बुधवारी मध्यरात्री (दि. 8) ते गुरुवारी (दि. 9) सायंकाळपर्यंत छापेमारी सुरू होती. कोथरूड येथील दुचाकी चोरी प्रकरणानंतर खऱ्या अर्थाने पुणे आणि महाराष्ट्रातील दहशतवादी कारवाईचा उलगडा झाला. या प्रकरणामुळे तपास यंत्रणांनी या प्रकरणाशी संबंधित आरोपींना यापूर्वी अटक केली आहे.(Latest Pune News)

मोहम्मद शहानवाज आलम शफीउमा खान ऊर्फ इबाहीम ऊर्फ प्रिन्स (वय 32, रा. झारखंड), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी ऊर्फ छोटु (वय 27, रा. कोंढवा, मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश), जुल्फिकार अली बरोडावाला ऊर्फ लाला ऊर्फ लालाभाई (वय 44, बोरीवली, राहुर पडगा, भिवंडी, ठाणे, मूळ रा. बरोडा, गुजरात) तलाह खान हे पुणे इसिस मोड्युलमध्ये आरोपी असलेले त्यांचा सातारा लुटमारीच्या अनुषंगाने सहभाग आढल्याने त्यांना अटक झाली होती.

सध्या पुणे इसिस मोड्युल प्रकरणाची सुनावणी मुंबई एनआयएच्या विशेष न्यायालयात सुरू असून, या प्रकरणात मुख्य आरोपपत्रासह दोन पुरवणी आरोपपत्र दाखल झाली आहेत. यामध्ये मोहम्मद शहानवाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख आणि तलाह लियाकत खान, मोहम्मद इमान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ मटका ऊर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम मध्यप्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी ऊर्फ अदिल ऊर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगिर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा, पुणे), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला ऊर्फ लालाभाई ऊर्फ लाला ऊर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (रा. तिघेही रा. पडघा, ठाणे) आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सर्वांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (युएपीए), एक्स्लोसीव्ह सबस्टन्स ॲक्ट, आर्म ॲक्ट तसेच विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद आलम हा कोथरूड येथून दुचाकी चोरताना कोथरूड पोलिसांनी त्याला पोलिसांनी पकडले होते. पकडण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी तो एक होता. मात्र त्याला कोंढवा येथे तपासासाठी नेल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. त्यानंतर त्याला 2 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी अटक करून ‌’एनआयए‌’कडे पुढील तपासासाठी वर्ग केले होते.

आलमला जेव्हा ताब्यात घेण्यात आले, तेव्हा त्याच्या सापडलेल्या कपड्यावरील व त्याचे डीएनए सॅम्पल जुळले. पकडण्यात आलेले सर्व दहशतवादी इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनी पुण्यात आणि महाराष्ट्रात मोठे दहशतवादी कृत्य करण्याची योजना आखल्याचेही ‌’एनआयए‌’ने केलेल्या तपासात निष्पन्न झाले. पकडण्यात आलेले दहशतवादी विदेशात बसलेल्या हँडलरच्या सिक्रेट ॲपद्वारे संपकृात असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यांनी दरोडे, चोऱ्या करून दहशतवादी कृत्यासाठी निधी उभा केल्याचे व त्यांनी हँडलरकडून देखील पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे दहशतवाद्यांनी आयईडी (इम्प्रूव्हाईस एक्स्पोझीव्ह डिव्हाईस) म्हणजेच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण कोंढव्यात घेतले होते. त्या आधारे त्यांनी जंगलात रेकी करून नियंत्रित स्फोटाच्या चाचण्यादेखील घडवून आणल्या होत्या. त्यांचा महाराष्ट्रातील तसेच गुजरातमधील ‌’मेट्रोसिटी‌’मध्ये स्फोट घडवून आणण्याचाही कट होता. त्यांनी दहशतवादी कारवाईसाठी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देखील घेतल्याचे एनआएच्या तपासात निष्पन्न झाले. त्यांनी त्यांचा परदेशातील इसिसचा दहशतवादी हँडलर खलिफा याच्याकडून इसिसशी संबंधीत शपथ घेतली असल्याचे निष्पन्न झाले होते. यामध्ये राजस्थान येथे स्फोटके बाळगल्या प्रकरणातील आरोपींचा सहभागा कोथरूड येथे दुचाकी चोरताना आढळला. पुढे सातारा ते पुणे इसिस मोड्युल उघड झाले.

प्रकरणाचा आजवर झालेला तपास

पुणे पोलिसांनी कोथरूड येथून केली होती तिघांना अटक.

चित्तोरगड येथील स्फोटके बाळगल्याचा गुन्ह्यात सहभाग.

बंदी घातलेल्या अल्सुफा संघटनेशी संबंध.

मोहम्मद आलम झाला होता फरार.

दहशतवाद्यांकडे आईडी, पिस्तुल आणि दारूगोळा देखील सापडला.

फरार दहशतवाद्यांना आश्रय देण्याबरोबर त्यांना इम्प्रुव्हाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आईडी) तयार करण्यासाठी पूर्व तयारी.

आरोपींच्या तपासात दहशवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन.

बॉम्बस्फोट केल्यानंतर अटक टाळण्याची योजना त्यांनी आखली.

अटकेपासून वाचण्यासाठी दुर्गम जंगलात लपण्याचा देखील प्लॅन.

जंगलात लपण्यासाठी ड्रोनद्वारे ती जंगलातील ठिकाणे देखील शोधली.

दहशतवादी कृत्यासाठी त्यांना भारतातून तसेच परदेशातून वित्तपुरवठा.

भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहचविण्याचा उद्देश.

भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा हेतू.

महाराष्ट्र, गोवा, तेलंगणासह इतर राज्यामध्ये इसिसचा प्रसार करण्यासाठी रेकी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT