बारामती : बारामती नगरपरिषदेवर 41 पैकी 21 जागी महिलांना संधी मिळणार आहे. यानिमित्ताने अनेक महिलांना आपापल्या प्रभागात कर्तृत्व गाजविण्याची संधी मिळणार आहे. काही प्रभागात मात्र महिलांकडे नगरसेवक पद जाणार असले तरी प्रत्यक्षात त्यांचे पतीच अधिकची लुडबूड करतील अशी स्थिती आरक्षणाने निर्माण केली आहे. काही मातब्बरांनाही आरक्षण सोडतीत झटका बसला आहे. अन्य प्रवर्गाचे आणि विशेषतः महिलांचे आरक्षण तेथे पडल्याने आता या मंडळींना अन्य प्रभागाची चाचपणी करावी लागणार आहे. परंतु, हक्काचा मतदारसंघ सोडत अन्य प्रभागातील मतदार त्यांना स्वीकारतील का, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणार आहे.
बारामती नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवारी (दि. 8) काढण्यात आली. पालिकेच्या एकूण 41 जागांपैकी 21 जागी महिलांना संधी मिळणार आहे.
उपविभागीय अधिकारी वैभव मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. या वेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुधवारी निघालेल्या सोडतीनुसार सर्वसाधारण गटातील महिलांना 11, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी 6 तर अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी चार जागा आरक्षित झाल्या. बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी यापूर्वीच आरक्षित झाले आहे. बारामती नगरपरिषदेचे एकूण 20 प्रभाग आहेत. त्यात 1 ते 19 प्रभागात प्रत्येकी दोन तर क्रमांक 20 च्या प्रभागात तीन जागा आहेत.
प्रभाग 1 अ- अनुसूचित जाती, 1 ब- सर्वसाधारण (महिला), प्रभाग 2 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 2 ब- सर्वसाधारण. प्रभाग 3 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, 3 ब- सर्वसाधारण (महिला), प्रभाग 4 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 4 ब- सर्वसाधारण. प्रभाग 5 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, 5 ब-सर्वसाधारण (महिला). प्रभाग 6 अ- सर्वसाधारण (महिला), 6 ब- सर्वसाधारण. प्रभाग 7 अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग, 7 ब- सर्वसाधारण (महिला). प्रभाग 8 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 8 ब- सर्वसाधारण. प्रभाग 9 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, 9 ब- सर्वसाधारण (महिला). प्रभाग 10 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 10 ब- सर्वसाधारण. प्रभाग 11 अ- सर्वसाधारण (महिला), 11 ब - सर्वसाधारण. प्रभाग 12 अ-अनुसूचित जाती (महिला), 12 ब-सर्वसाधारण. प्रभाग 13 अ- अनुसूचित जाती (महिला), 13 ब- सर्वसाधारण. प्रभाग 14 अ- अनुसूचित जाती (महिला), 14 ब- सर्वसाधारण. प्रभाग 15 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 15 ब- सर्वसाधारण. प्रभाग 16 अ- अनुसूचित जाती, 16 ब- सर्वसाधारण (महिला). प्रभाग 17 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, 17 ब-सर्वसाधारण (महिला). प्रभाग 18 अ- अनुसूचित जाती, 18 ब- सर्वसाधारण (महिला). प्रभाग 19 अ- अनुसूचित जाती (महिला), 19 ब- सर्वसाधारण. प्रभाग 20 अ- अनुसूचित जाती, 20 ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), 20 क- सर्वसाधारण (महिला).