Pune ATS Raid : सातारा दरोडा ते इसिस कनेक्शन; पुण्यात 19 ठिकाणी एटीएसचे छापे

ISIS connection Maharashtra | इसिसला दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारल्या प्रकरणी कारवाई
Pune ATS Raid
19 ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) छापेमारी करत काही जणांना ताब्यात घेतले.
Published on
Updated on

Pune ATS investigation

पुणे : इसिसला दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारल्या प्रकरणात व राष्ट्रविरोधी कारवाई केल्याप्रकरणात शहरात 19 ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) छापेमारी करत काही जणांना ताब्यात घेतले. यावेळी कोंढवा आणि अन्य ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात डिजीटल साहित्यासोबत इसिसच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. बुधवारी रात्री मध्यरात्रीपासून पुण्यात पुणे पोलिसांच्या तब्बल 25 हून अधिक पथकांच्या मदतीने एटीएसने ही छापेमारी केली.

एटीएसने जून- जुलै महिन्यात सातार्‍यात दहशतवाद्यांनी साडी दुकानदाराची लुटमार केल्याप्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत काहींची नावे समोर आल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचे एटीएसने एका मेसेजद्वारे स्पष्ट केले आहे. बुधवारी (दि.8) रात्री मध्यरात्री पासून गुरूवारी (दि.9) सायंकाळी सहावाजेपर्यंत सुरू असलेल्या कारवाईत कोणाला ताब्यात घेतले हे स्पष्ट केले नाही.

Pune ATS Raid
Pimpri Chinchwad ATS Raid | मोशीतील उच्चभ्रू सोसायटीवर 'एटीएस'चा छापा: तरुण ताब्यात

साताऱ्यातील साडीच्या दुकानावर दरोडा टाकून चोरलेल्या रकमेपैकी काही रक्कम संशयित इसिसच्या दहशतवाद्यांनी बॉम्बचे (आयईडी - इप्रूव्हाईज एक्सप्लोझीव्ह डिव्हाईस) साहित्य खरेदी करण्यासाठी वापरल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती. एप्रिल 2023 मध्ये टाकलेला हा दरोडा म्हणजे दहशतवादी कारवायांच्या निधी उभारणीसाठी केलेले कृत्य असल्याचे तपासातून समोर आले होते. त्याच अनुषंगाने एटीएसने 7/2023 हा गुन्हा नव्याने गुन्हा दाखल केला होता. त्याच गुन्ह्याचा तपास पुणे एटीएस करत आहे. त्याच दरोडा प्रकरणात आत्तापर्यंत चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील तपासात साताऱ्यातील दरोड्याचे इसिस कनेक्शनदेखील उघड झाले.

याप्रकरणात आत्तापर्यंत पुण्यातील इसिस मोड्युल प्रकरणात सहभागी असलेले दहशतवादी मोहम्मद शहानवाज आलम शफीउमा खान ऊर्फ इब्राहीम ऊर्फ प्रिन्स (वय 32, रा. झारखंड), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी ऊर्फ छोटु (वय 27, रा. कोंढवा, मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश), जुल्फिकार अली बरोडावाला ऊर्फ लाला ऊर्फ लालाभाई (वय 44, बोरीवली, राहुर पडगा, भिवंडी, ठाणे, मूळ रा. बरोडा, गुजरात) आणि जून महिन्यात तलाह लियाकत अली खान (वय 37, रा. कोंढवा) याला मुंबईतील कारागृहातून साताऱ्यातील दरोड्यात सहभाग असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती.

Pune ATS Raid
Pimpari Chinchwad: नऊ वर्षांत पाच लाखांनी भर; लोकवस्ती वाढल्याने शहरातील मतदारसंख्येत वाढ

दि. 8 एप्रिल 2023 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील अजंठा चौकात असलेल्या एका साडीच्या दुकानावर पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यात या दहशतवाद्यांनी एक लाखाची रोकड चोरी करून नेली होती. पुणे मोड्युल प्रकरणातील दहशतवाद्यांना कोथरूडमध्ये पकडल्यानंतर त्यांचा सातार्यातील दरोड्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा गुन्हा पुणे एटीएस करत आहे. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने संशयीतांकडे करण्यात आलेल्या चौकशीत नवीन नावे निष्पन्न झाल्याने शहरात 19 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

कारवाईत पुणे पोलिसांची 25 पथके कारवाईसाठी सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामध्ये 35 सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक 300 पोलिस कर्मचारी तीन पोलिस उपायुक्त, चार सहायक पोलिस आयुक्त हे कारवाईत सहभगाी झाले होते. त्याबरोबरच क्वीक रिस्पॉन्स टीमचे पथक, गुन्हे शाखेची पाच पथके तैनात करण्यात आली होती. गुरूवारी सायंकाळपर्यंत ही छापेमारी सुरू होती.

Pune ATS Raid
Pimpri Chinchwad municipal ward reservation 2025: पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रभाग फुटल्यामुळे राजकीय समीकरण बदलले; एससी-एसटी आरक्षण जाहीर

कसे आले सातारा कनेक्शन समोर

पुण्यातून फरार झालेल्या दहशतवाद्याला दिल्ली स्पेशल सेलने मोहंमद साकी याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील तपासात साताऱ्यात दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले. तसेच, पिस्तुलाचा धाक दाखवून एक लाख लुटल्याची कबुली. त्याला यासाठी जुल्फीकार बरोडा वाला याने मदत केल्याचेही त्याने सांगितले होते.

अटक आरोपी हे इसिससाठी काम करत असल्याचेही निष्पन्न

आरोपींनी टाकलेल्या दरोड्यातील काही रक्कम ही बॉम्बचे साहित्य खरेदी करण्यासाठी निष्पन्न झाले आहे. आरोपींनी इसिससाठी निधी उभा केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, तलाह खान याचाही सहभाग निष्पन्न झाला. तलाह खान हा मस्कत या ठिकाणी गेला होता. त्यानंतर तो इतर देशातही फिरला असल्याची शक्यता नुकतीच एटीएसने वर्तवली होती. तर जुल्फीकार बरोडावाला याने मोहम्मद साकी याला दोन पिस्तुले दिल्याचे निष्पन्न झाले आहे. तर त्यांना यासाठी तलाह खान याने मदत केली असल्याचेही समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news