पुणे

पुणे : सारोळा येथे घुसले तीन रानगवे; बघ्यांच्या गर्दीमुळे झाले सैरभैर

अमृता चौगुले

सारोळा : पुढारी वृत्तसेवा : पुणे-सातारा महामार्गालगत सारोळा (ता.भोर जि.पुणे) येथे तीन गव्याचे दर्शन झाले. बुधवारी(दि. ८) सकाळी ८ वाजल्या पासून लोकांचा आरडाओरडा आणि बघ्यांच्या गर्दीमुळे त्यातील एक गवा बिथरला होता. नसरापुर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या गव्याला हळूहळू महामार्ग ओलांडून वन क्षेत्रात नेण्यात प्रयत्न केला जात आहे.

सारोळा रानगवा आढळल्याची बातमी पसरताच बघ्यांची मोठी गर्दी या भागात झाली. या गर्दीमुळे वनविभागाला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी आल्या. बिथरलेल्या गव्याने घरांचे गेट, वाहने यांना धडक दिली. त्यात तो जखमी झाला. दुपारी १२ वाजत्याला पडकण्यात भोरउपविभागीय अधिकारी आशा भोम नसरापुर वन अधिकारी संग्राम जाधव भोर वन अधिकारी दत्तात्रय मिसाळ , राजगड पोलीस निरिक्षक सचिन पाटील , महामार्ग पोलीस सहाय्यक निरिक्षक अस्लम खातीबव पुणे येथील प्राणी रेक्युस याचे सर्व कर्मचारी पथक उपस्थित होते.

महामार्गावरील वाहने थांबवून बिथरलेल्या रानगव्याला रस्त्याच्या पलीकडे असलेल्या वनक्षेत्रात नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT