पुणे

आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा : पुण्याच्या चार जणींना सुवर्णपदक

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्यातील चार महिलांनी 24 सुवर्णपदके जिंकली. यामध्ये 66 वर्षीय लॉरेन मोरे आणि 46 वर्षीय ज्योती भाडेकर यांनी आठ, तर नीता मेहता आणि श्रुतिका राऊत यांनी प्रत्येकी चार सुवर्णपदके मिळवली.

ही स्पर्धा तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे पार पडली. आशियाई मास्टर्स पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तळेगावच्या लॉरेन मोरे (66) आणि पुण्याच्या ज्योती भाडेकर (46) यांनी भारतासाठी प्रत्येकी आठ सुवर्णपदके जिंकली. मोरे आणि भाडेकर यांनी पुण्याच्या जी 99 फिटनेस अकादमीतर्फे महिलांच्या संघाचे नेतृत्व करीत भारतासाठी 24 सुवर्णपदके जिंकली आहेत. 165 किलो वजन उचलणार्‍या मोरे यांना 60 + वयोगटातील आशियातील सर्वांत बलवान महिला म्हणून गौरवण्यात आले. इतर पुण्याच्या महिलांमध्ये नीता मेहता आणि श्रुतिका राऊत यांचा समावेश आहे.

याबाबत प्रशिक्षक गिरीश बिंजवे म्हणाले, 'लॉरेन मोरे गेल्या तीन वर्षांपासून खूप कठोर प्रशिक्षण घेत आहेत. तळेगाव ते पुणे आणि परत प्रशिक्षणासाठी दररोज 60 किमी प्रवास करण्यासाठी दृढनिश्चय आवश्यक आहे. ज्योती भाडेकर या चार वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहेत आणि त्या गृहिणी असल्या तरी त्यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे. त्यांचा मुलगा ओंकार हा त्यांचा मोठा आधार आहे.'

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT