Fire-extinguisher-escaped-small-girl 
पुणे

अग्निशमन दलाने केली चिमुकलीची सुटका ; बेडरूमचा दरवाजा लॉक झाल्यामुळे पडली होती अडकून

backup backup

वाकड : पुढारी वृत्तसेवा :

एक्सोटिका कल्पतरू सोसायटीमधील फ्लॅटमधील बेडरूमचा दरवाजा आतून लॉक झाल्यामुळेदीड वर्षीय चिमुकली अडकून पडली होती. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन चिमुकलीला बाहेर काढून तिच्या आईकडे सोपविले. त्यामुळे सर्वांना सुटकेचा नि:श्वास सोडला.

पिंपळे सौदागर येथील एक्सोटिका कल्पतरू सोसायटीमध्ये इंगवले परिवार राहत आहे. त्यांची दीड वर्षीय मुलगी इशान्वी बेडरूममध्ये खेळत होती. त्यामुळे चुकून दरवाजा लॉक झाला. दरवाजा उघडता येत नसल्याने ती रडत होती व प्रचंड घाबरलीदेखील होती.

दरवाजा उघडत नसल्याने घरच्यांची अवस्था अतिशय केविलवाणी झाली होती. याची तात्काळ माहिती अग्निशमन केंद्राला दिल्यानंतर अग्निशामक दलाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली.

मुख्य अग्निशमन दल पिंपरी येथील जवानांनी अग्निशमन साहित्याचा उपयोग करून दरवाज्याची कडी तोडून अलगद इशान्वीला बाहेर काढले आणि तिच्या आई-वडिलांकडे सुर्पूद केले.

अग्निशमन दलाचे जवान विशाल फडतरे, बाळासाहेब वैद्य, दिग्विजय नलावडे, कृष्णा राजकर, सिद्धेश दरवेश, अर्जुन वाघमारे, स्मिता गौरकर, धनश्री बागुल, श्वेता गायकवाड यांनी ईशान्वी हिची सुखरूप सुटका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT