जळोची : दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. दाराबाहेरची विविध रंगांची उधळण करणारी रांगोळी, हे या सणाचे खास आकर्षण. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीत कपडे, आकाशकंदील, पणती, फटाके याचबरोबर रांगोळी लक्ष वेधून घेते. यंदा 16 प्रकारचे रंग बाजारात उपलब्ध असून पांढऱ्या रांगोळीबरोबरच रंगांच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Latest Pune News)
दिवाळीत दाराबाहेर रांगोळी काढणे ही आपली संस्कृती. विविध व आकर्षक रंगांचा साज रांगोळीवर चढवला जातो. जाडी रांगोळी व भरडी रांगोळी असे पांढऱ्या रांगोळीचे प्रकार आहेत. होलसेलमध्ये पांढरी रांगोळी 6 ते 7 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. किरकोळमध्ये 10 ते 12 रुपये किलोने विकत आहे. रांगोळीचे दरही महागले आहेत.\
हे रंग 10 रुपये दराने होलसेल दरात विकत असून किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये किलोने मिळत आहेत. साध्या रंगांना जास्त मागणी असल्याने पूर्वी मोठ्या प्रमाणात माल विकला जायचा, परंतु रांगोळीमिश्रित रंग बाजारात आल्यापासून साध्या रंगाचा खप कमी आहे. रंगामध्ये गडद रंगापेक्षा रांगोळीमिश्रित रंगाला महिलांकडून
पूर्वी घरासमोर अंगणात शेण सारवून त्यावर रांगोळी काढली जायची. आता बऱ्याच घरासमोर फरशी व पेव्हर ब्लॉक आहेत. तरी देखील सण-उत्सव, शुभविवाह, शुभकार्य, उद्घाटन आदी वेळी रांगोळी काढली जाते. त्यामुळे अत्याधुनिक युगात घरासमोरील रांगोळी बंद झाली नाही. दिवाळीत रांगोळी व रंग यांचे महत्त्व जास्त असल्याने रांगोळी व रंगांचा व्यवसाय तेजीत आहे.
राजस्थान, गुजरात यांसारख्या ठिकाणाहून रांगोळीची आवक होत असून प्रत्येक होलसेल व्यापाऱ्यांची 30 ते 40 टन पांढरी रांगोळी बाजारात विक्रीसाठी आणली जाते. दिवाळीमध्ये होलसेल व्यापाऱ्याची अडीच ते तीन लाखांची उलाढाल फक्त रांगोळीमुळे होत असते.
भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी हे मांगल्य आणि आनंदाचे प्रतीक समजतात. त्यामुळे दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या प्रमाणावर खप वाढतो. परंतु रांगोळीतून विविध चित्रे साकारणे यासाठी स्पर्धा, प्रदर्शन नेहमी चालू असतात. दिवाळीत अशा कार्यक्रमांना शहरात बहार येतोसुनंदा जगताप, शिक्षिका, बारामती
रांगोळी काढणे ही एक कला आहे. त्यासाठी विविध क्लासेस उपलब्ध आहेत. परंतु गृहिणी, मुली यांना खऱ्या अर्थाने दिवाळीत रांगोळी काढण्यासाठी संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. रांगोळीशिवाय दिवाळी नाही, त्यामुळे दिवाळी व रांगोळी यांचे अतूट नाते आहे.मीना येवले, रांगोळी विक्रेत्या