

पिरंगुट: कोलाड महामार्गावर भुकूम येथे डंपर आणि चार चाकी च्या अपघातामध्ये चार चाकीला आग लागली. यामध्ये चालककार्तिक जयेश हाडके वय २१ रा. लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे.) हा किरकोळ जखमी झालेला असून प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे कारचालकाची चुकी असून ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये तो पिरंगुट कडून पुण्याकडे जाणाऱ्या डंपरला धडकला.(Latest Pune News)
कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. परांजपे स्कीम्सच्या फॉरेस्ट स्ट्रेल्स या ठिकाणी असलेल्या फायर ब्रिगेड स्टेशनमुळे येथील फायर ब्रिगेडची गाडी घटना झाल्यानंतर दहा मिनिटांमध्ये येथे आली आणि गाडीला लागलेली आग विझवली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.
यानंतर पुणे महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड ची गाडी आली परंतु तोपर्यंत आज वीजलेली होती. या ठिकाणी ग्रामस्थांनी स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी केली आहे. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.