Dipali Doke Ward 11 Pune: प्रभाग ११ साठी दीपाली डोख यांचा निर्धार : कचरा, ड्रेनेज, मंडई व क्रीडांगणाचे प्रश्न लवकरच मार्गी Pudhari
पुणे

Dipali Doke Ward 11 Pune: प्रभाग ११ साठी दीपाली डोख यांचा निर्धार : कचरा, ड्रेनेज, मंडई व क्रीडांगणाचे प्रश्न लवकरच मार्गी

जय भवानीनगर ते शिवतीर्थनगरपर्यंत विकासाचा रोडमॅप; गरीब महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे/पौड रोड : माझे बालपण जय भवानीनगरमध्ये गेल्याने या प्रभागात काय समस्या आहेत, ते मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. गेल्या काही वर्षांपासून मी समाजकार्य करीत आहे. आता जनतेने संधी दिल्याने पुढील पाच वर्षांत प्रभागातील भाजी मंडई, खेळण्याचे मैदान, कचऱ्याची समस्या, ड्रेनेजलाइन असे विविध प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचा निर्धार प्रभाग क्रमांक 11 शिवतीर्थनगर, रामबाग कॉलनीमधून निवडून आलेल्या दीपाली डोख यांनी व्यक्त केला.

दीपाली डोख यांनी दै. ‌‘पुढारी‌’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास व प्रभागात काय काय कामे करणार? याबद्दल सविस्तर माहिती दिली. डोख म्हणाल्या, माझे पती संतोष डोख व मी दोघेही मुळाशी भागातील आहोत. आमच्या प्रभागात आम्ही सातत्याने समाजकार्य करीत आहोत. नागरिकांच्या सुख-दुःखात व त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत असल्याने मतदारांनी मला चांगल्या मतांनी निवडून दिले. पती संतोष डोख यांनी गणपती मंडळापासून समाजसेवेला सुरुवात केली. 2012 मध्ये राष्ट्रवादी कॉंग््रेासचे प्रभाग अध्यक्ष म्हणून आम्ही राजकारणात प्रवेश

केला. पती संतोष यांच्यासोबत मी देखील सामाजिक कार्याला सुरुवात केली. महिलांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले. कोरोना काळात नागरिकांना मदत केली, महिलांसाठी रोजगाराविषयी माहिती देऊन त्यांचे फॉर्म भरून त्यांना मार्गदर्शन केले. गरजूंसाठी आरोग्य शिबिरे भरवली. जनसंपर्क कार्यालयामार्फत नागरिकांच्या समस्या सोडविल्या. 2017 ला महापालिका निवडणुकीची तयारी केली. मात्र, संधी मिळाली नाही. यानंतर आम्ही निरंतर समाजसेवेला वाहून घेतले. या

निवडणुकीत प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने मला कॉंग््रेासकडून संधी मिळाली. आम्ही दोघांनी केलेल्या कामांमुळे मतदारांनी आम्हाला कौल दिला. प्रभागातील अतिक्रमणे, वाहतूक प्रश्न व कचरा आणि ड्रेनेजची कामे प्राधान्याने करणार आहोत, असे डोख म्हणाल्या.

प्रभागातील ही कामे सोडवणार

1) भाजीविक्रेत्यांना जागा निश्चित करून एका ठिकाणी मंडई बांधून देणार.

2) जागोजागी पदपथांवरील अतिक्रमण काढून नागरिकांना चालण्यासाठी मार्ग मोकळा करणे.

3) लहान व मोठ्या मुलांना खेळण्याकरिता मैदानाच्या जागेसाठी पाठपुरावा करणार.

4) राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) येथे नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी दवाखाना उभारणार.

5) डोंगर भागातील उताराच्या ठिकाणी सीमाभिंत बांधण्याला प्राधान्य देणार.

दै. ‌‘पुढारी‌’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ‌‘सिंहायन‌’ हे आत्मचरित्र स्वीकारताना दीपाली डोख.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT