Junnar Onion Farmers: उत्पादन भरघोस, पण भाव कवडीमोल; जुन्नरच्या कांदा उत्पादकांचा संताप

दहा–पंधरा रुपयांत विक्री; वाढत्या खर्चामुळे एकरी ४० ते ५० हजारांचा खर्चही वसूल नाही
Junnar Onion Farmers
Junnar Onion FarmersPudhari
Published on
Updated on

बेल्हे : यावर्षी पाऊस चांगला झाल्याने कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. मात्र, कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या मिळत असलेल्या भावाचा विचार करत उत्पादनाचा खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

Junnar Onion Farmers
Synthetic Intelligence | कृत्रिम बुद्धिमत्तेनंतर (AI) आता ‘सिंथेटिक इंटेलिजेन्स’ची (SI) चर्चा

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, बेल्हे, गुंजाळवाडी, गुळुंचवाडी, बांगरवाडी, बोरी बुद्रुक, निमगाव सावा, साकोरी, मंगरूळ, उंचखडक, आणे, नळावणे, शिंदेवाडी, पठार भागातही मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. यंदा उत्पादन चांगले झाले मात्र सध्या कवडीमोल भावात विक्री होत आहे. या परिसरातील कांदा आळेफाटा,

Junnar Onion Farmers
Pune Water Supply: समाविष्ट गावांतील नागरिक टँकरच्या भरवशावर; पाणी योजनांची कामे रखडली

ओतूर, जुन्नर, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत विकला जातो. बाजार भाव कमी मिळत असल्याने भांडवली खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. सध्या चांगल्या प्रतीचा कांदा दहा ते पंधरा रुपये किलोने विकला जात आहे. दोन नंबर प्रतीचा कांदा पाच ते दहा रुपये दराने विक्री होत आहे.

Junnar Onion Farmers
Khadki Murder Case: पुण्यात कर्जबाजारी पतीकडून पत्नीचा गुदमरवून खून; रात्रभर मृतदेहाशेजारी बसून सकाळी पोलिसांना कबुली

कांदा उत्पादनाचा खर्च वाढला आहे. खते,औषधे,फवारणीमुळे मशागत खर्च भरमसाठ झाला आहे. मजुरी वाढल्यामुळे कांदा पीकासाठी एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. मात्र, तो देखील वसुल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे, असे कांदा उत्पादक संदीप औटी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news