MEA International Business Expo: पुण्यात ‘MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो’ला आजपासून सुरुवात; 550 हून अधिक उद्योजकांचा सहभाग

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन; उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत इंडस्ट्रियल मिट
MEA International Business Expo
MEA International Business ExpoPudhari
Published on
Updated on

पुणे : मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनच्या (एमईए) वतीने आयोजित ‌‘एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो‌’ शुक्रवार (दि. 27) पासून रविवार दिनांक 1 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

MEA International Business Expo
Patas Daund Car Fire: पाटस येथे धावत्या चारचाकीला भीषण आग; वाहन जळून खाक, अर्धा तास वाहतूक ठप्प

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज सकाळी साडेदहा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. शनिवारी (दि. 28) दुपारी 3 ते 6 या वेळेत राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत इंडस्ट्रिअल मिटचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधी यातून कळतील.

MEA International Business Expo
Nira Left Canal Water: निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू; बारामती-इंदापूर शेतकऱ्यांना मोठा दिलासा

या प्रदर्शनात 550 पेक्षा अधिक बिझनेस एकाच छताखाली येत आहेत. रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, आयटी, एफएमसीजी, ॲग््राो-टेक, लाइफस्टाईल, शिक्षण, हॉस्पिटॅलिटी, सेवा क्षेत्र, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट, ऑटोमोबाईल, हेल्थ अँड वेलनेस, बँकिंग व फायनान्स या क्षेत्रातील 500 हून अधिक स्टॉल असतील. देश-विदेशातील मराठा उद्योजक, व्यावसायिक, उद्योगपती आणि स्टार्टअप्स यात सहभागी होत आहेत.

MEA International Business Expo
Junnar Onion Farmers: उत्पादन भरघोस, पण भाव कवडीमोल; जुन्नरच्या कांदा उत्पादकांचा संताप

व्यवसाय, गुंतवणूक, नावीन्यपूर्ण कल्पना आणि सहकार्य, यातील जागतिक दर्जाच्या संधी अनुभवता येणार आहेत. सध्या व्यवसायात असलेल्या आणि नव्याने व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांना विविध गोष्टींची देवाणघेवाण करण्याची उत्तम संधी यानिमित्ताने मिळणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद साठे, सचिव राजेश कुराडे, खजिनदार सई बहिरट पाटील, माजी अध्यक्ष अरुण निम्हण, सायली काळे, आश्रम काळे, तेजस चरवड, महेश घोरपडे या वेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news