पुणे

पुणे : डेमू, मेमू आता येत्या 11 तारखेपासून पूर्ण क्षमतेने धावणार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे निम्म्या क्षमतेने सुरू असलेली सर्व डेमू, मेमू आणि लोकलची सुविधा आता पूर्ण क्षमतेने येत्या 11 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने डेमू, मेमू आणि लोकलची सुविधा निम्म्या क्षमतेने सुरू ठेवली होती, आता महाराष्ट्र निर्बंधमुक्त होत असल्यामुळे पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. यात पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर, दौंड, बारामती, लोणावळादरम्यान धावणार्‍या सर्व डेमू, मेमू, लोकल रेल्वे गाड्या पूर्वीप्रमाणे सर्वच्या सर्व धावणार आहेत. पूर्वी गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. आता हे हाल थांबणार आहेत.

या शहरांत सेवा

ही सेवा पूर्ववत होत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पुणे, सांगली, मिरज, कोल्हापूर, दौंड, बारामती, लोणावळा या शहरांचा यात समावेश आहे.

प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता, आम्ही डेमू, मेमू आणि लोकलची सुविधा पूर्ववत करण्याची मागणी केली होती. ती आता पूर्ण झाली असून, आमच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे येत्या 11 तारखेपासून सर्व डेमू, मेमू, लोकल रेल्वे गाड्या सुरू होणार आहेत.
                                                                     – हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

कोरोनामुळे निम्म्या क्षमतेने सुरू असलेली डेमू, मेमू आणि लोकल गाड्यांची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. पुणे विभागातून विविध ठिकाणी धावणार्‍या या सर्व लोकल, मेमू, डेमू गाड्या कोरोना काळाअगोदर जशा पूर्ण क्षमतेने धावत होत्या, आता तशा धावतील. येत्या 11 तारखेपासून प्रवाशांना या गाड्यांमधून प्रवास करता येणार आहे.
                                             – मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

या गाड्या सुरू होणार

  • डेमू क्रमांक 01521 – पुणे प्रस्थान 04.20 – दौंड आगमन 05.45,
  • डेमू क्रमांक 01522 – दौंड प्रस्थान 06.10 – पुणे आगमन 07.40
  • मेमू क्रमांक 01529 – पुणे प्रस्थान 15.00 – दौंड आगमन 16.52,
  • मेमू क्रमांक 01530 – दौंड प्रस्थान 17.02 – पुणे आगमन 18.32.
  • मेमू क्रमांक 01533 – पुणे प्रस्थान 20.05 – दौंड आगमन 21.35.
  • मेमू क्रमांक 01532 – बारामती प्रस्थान 22.15 – दौंड आगमन 23.30.
  • गाडी क्रमांक 01526 – बारामती प्रस्थान 07.10 – पुणे आगमन 10.05.
  • मेमू क्रमांक 01523 – दौंड प्रस्थान 05.45 – बारामती आगमन 07.00.
  • मेमू क्रमांक 01527 – दौंड प्रस्थान 15.20 – बारामती 16.35.
  • गाडी क्रमांक 11425 – पुणे प्रस्थान10.50 -कोल्हापूर आगमन 19.30,
  • गाडी क्रमांक 11426 – कोल्हापूर प्रस्थान 05.30 – पुणे आगमन 13.35.

या गाड्या 15 एप्रिलपासून पूर्ववत

  • डेमू क्रमांक 01547 – मिरज प्रस्थान 17.00 – कोल्हापूर आगमन 18.10,
  • डेमू क्रमांक 01548 – कोल्हापूर प्रस्थान 21.30 – मिरज आगमन 22.45
  • डेमू क्रमांक 01543 – मिरज प्रस्थान 14.50 – कोल्हापूर आगमन 15.30,
  • डेमू क्रमांक01544 – कोल्हापूर प्रस्थान 10.30 – मिरज आगमन 11.45.
  • डेमू क्रमांक 01549 – सांगली प्रस्थान 20.35 – कोल्हापूर आगमन 22.20,
  • डेमू क्रमांक 01550 – कोल्हापूर प्रस्थान 18.40 – सांगली आगमन 20.20.
SCROLL FOR NEXT