Stock Market Today : सेन्सेक्सनं पार केला ६० हजारांचा टप्पा; निफ्टी १८ हजारांवर | पुढारी

Stock Market Today : सेन्सेक्सनं पार केला ६० हजारांचा टप्पा; निफ्टी १८ हजारांवर

पुढारी ऑनलाईन डेस्क

Stock Market Today : एचडीएफसी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचं HDFC बँकेत विलीनीकरण करण्याची घोषणा झाली. या घोषणेनंतर एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक शेअर्सची जोरदार खरेदी होत आहे. यामुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजाराचा निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक वधारला. सेन्सेक्सने (Sensex) ६० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर निफ्टीने (Nifty) १९ जानेवारीनंतर प्रथमच १८ हजारांचा टप्पा गाठलाय.

१ एप्रिल रोजी सेन्सेक्स ५९,२७६ अंकांवर पोहोचला होता. आज सोमवारी (दि.४) त्याने (Stock Market Today) ६० हजारांचा टप्पा पार केला. आज सोमवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १३०० अंकांनी वर जाऊन ६०, ५८० वर व्यवहार करत होता. तर निफ्टी ३५० अंकांनी वर जाऊन १८०० वर व्यवहार करत होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम बाजारात दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूड तेल गेल्या आठवड्यात सुमारे प्रति बॅरल १२१ डॉलर वरून १४ टक्क्यांनी घसरून १०३.६६ डॉलरवर आले आहे.

दरम्यान, भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३ पैशांनी वाढून ७५.७१ वर पोहोचला आहे.

हे ही वाचा :

Back to top button